google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना..अभ्यास न केल्याच्या रागातून पित्यानेच केला नऊ वर्षीय मुलाचा खून

Breaking News

धक्कादायक घटना..अभ्यास न केल्याच्या रागातून पित्यानेच केला नऊ वर्षीय मुलाचा खून

धक्कादायक घटना..अभ्यास न केल्याच्या 

रागातून पित्यानेच केला नऊ वर्षीय मुलाचा खून 

तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस, असे म्हणत रागातून वडिलांनी आपल्याच 9 वर्षाच्या मुलाला भिंतीवर आपटून, 

त्याचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आहे. सदरची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमरास होळ (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीत मुलाच्या आईसमोरच घडली आहे.

दरम्यान, याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष विजय भंडलकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

 याप्रकरणी वडील विजय गणेश भंडलकर, आई शालन विजय भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पियुष घरात असताना त्याच्या वडिलांनी अभ्यास करीत नसल्याबाबत त्याच्याशी बोलले होते. 

तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस, असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात

 पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. यावेळी त्याची आई शालन भंडलकर हजर होती.

दरम्यान, संतोष यांनी मुलाला निरा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मुलगा हा चक्कर आल्याने पडल्याचे सांगितले. 

डॉक्टरांनी पियुष मयत झाल्याचे सांगून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. मात्र, त्या तिघांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता पियुषचे प्रेत गावी नेले.

मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी सुरु केली होती. 

दरम्यान, पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळताच विजय भंडलकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments