google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील डोंगरगावच्या शलाका काळेचे उत्तुंग यश, जर्मनीच्या कंपनीमध्ये मिळाले 54 लाखाचे पॅकेज

Breaking News

सांगोला तालुक्यातील डोंगरगावच्या शलाका काळेचे उत्तुंग यश, जर्मनीच्या कंपनीमध्ये मिळाले 54 लाखाचे पॅकेज

सांगोला तालुक्यातील डोंगरगावच्या शलाका काळेचे उत्तुंग यश, जर्मनीच्या कंपनीमध्ये मिळाले 54 लाखाचे पॅकेज



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यातील शलाका संजय काळे हिची जर्मनी (Dortmund) येथील प्रतिष्ठित अशा Tintometer GmbH कंपनी मध्ये एम्बेडेड सिस्टम इंजिनीअर म्हणून निवड झाली आहे. 

यासाठी तिला कंपनीकडून वार्षिक 54 लाखाचे पॅकेज मिळाले आहे. शलाका ही डोंगरगाव ता.सांगोला येथील रहिवाशी व सध्या

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक संजय काळे गुरुजी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिका सौ.वंदना काळे यांची कन्या आहे.

शलाकाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे झाले. पुढे माध्यमिक शिक्षण पुणे येथील हुजूरपागा शाळा आणि उच्च माध्यमिक शिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे येथे झाले. 

त्यानंतर शलाकाने पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी विषयात बी टेक पूर्ण केले आहे.

 तर जर्मनी येथील कोबर्ग युनिव्हर्सिटी मधून सेन्सर टेकनॉलॉजी मध्ये मास्टर पूर्ण केले आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे व तिच्या पालकांचे सर्वत्र कौतुक केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments