google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय. सुरजदादा बनसोडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

Breaking News

रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय. सुरजदादा बनसोडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय. सुरजदादा बनसोडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

- जानेवारी ०१, २०२५ रोजी स्वर्गीय सुरजदादा बनसोडे यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम भीमनगर समोरील त्यांच्या कार्यालयामध्ये स्वर्गीय सुरजदादा बनसोडे यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. 

यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर भीमनगर परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. 

तसेच सांगोला ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळेवाटप करून, चिंचोली रोड येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील वयोवृद्ध नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

 यासह मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यासह विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते.

सांगोला शहरातील सर्वांगीण विकासासाठी तसेच गोरगरीब गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम अग्रेसर असणारे

 रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या माध्यमातून अनेक कार्यामध्ये सहभागी होऊन सर्वसामान्य गोरगरीब वंचितांना न्याय मिळवून देणारे माजी तगडा नगरसेवक सुरजदादा बनसोडे

 यांच्या जयंतीनिमित्त सांगोला शहर व तालुक्यातील बहुसंख्येने पँथर सुरजदादा बनसोडे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया सामाजिक संघटना तसेच सुरज दादा मित्र मंडळ उपस्थित होते.

 दरम्यान उपस्थित त्यांनी  स्वर्गीय सुरज बनसोडे यांच्या विचारांना उजाळा दिला. त्यांच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देऊन अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments