सांगोला पोलीसांची धडक कामगिरी सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच जेष्ट नागरी, पुरुष, महिला, विद्यार्थी, नवयुवक यांच्या मनामध्ये कोणत्याही गुन्हेगाराविषयी
भिती दहशत निर्माण होणार नाही. तसेच कॉलेज मधील शिक्षण घेत असलेल्या युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृतीचे लोकांकडे पाहुन आकर्षन वाटुन ते गुन्हेगारी प्रवृतीकडे वळू नये,
या करीता आम्ही सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील मालाविषक, शरीराविषााक, महिलाविषयक तसेच इतर अवेध्य धंद्याविषयी गुन्हे करणारे सराईत आरोपीतांबर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे.
पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी आम्ही सराईत गुन्हे, जुगार, गौण खनिन, शरीराविषयक, महिलाविषयक विनयभंग, शासकीय नोकरीवरील हल्ले, खून, अॅट्रॉसिटी अॅक्ट, फसवणुक
अशा वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या व त्यांच्या परिसरातील लोकांना त्रास देणा-या सराईत आरोपीविरुध्द तक्रार देण्यास कोणी धजावत नव्हते. व ज्या इसमाच्या विरुध्द पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
व त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजातील लोकामध्ये दहशत निर्माण झालेली आहे. अशा आरोपीतांबर खालील वेगवेगळ्या हेड खाली कायदेशीर कारवाई केलेली आहे.
सराईत आरोपीतांवर करण्यात आलेली कारवाई एकूण प्रतिबंधक कारवाई
अवेध्य धंद्यावर करण्यात आलेली कारवाई
1 वाळू चोरी, दारुबंदी, जुगार, गुटखा अशा अवैध्य धंद्यावर एकुण 317 केसेस करण्यात आलेल्या आहेत.
वरील प्रमाणे परिणाम कारक कारवाईमुळे सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सन 2023 पेक्षा सन 2024 मध्ये 140 ने कमी गुन्हे दाखल आहेत.
बरील प्रमाणे आम्ही सांगोला पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे प्रतिबंधत्माक कारवाई केल्यामुळे सन 2024 मधौल सार्वत्रीक लोकसभा व विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडलेली आहे. तसेच चालु वर्षात आम्ही
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56ब व 55 प्रमाणे व एम.पी.डी.ए. अॅक्ट प्रस्ताव पाटवून देवून एकूण 08 इसमांना संपुर्ण सोलापुर जिल्ह्यातुन हद्दपार / स्थानबध्द करुन त्याच्यामध्ये कायदाची जाणीव निर्माण करण्यात आली
असून आगामी सन 2025 मध्ये सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील गावातील गुन्हेगारी प्रवृतीचे लोकांवर करडीनजर ठेवून तसेच जेष्ठ नागरीक, महिला, व अल्पवयीन मुलीची छेड काढणारे
लोक यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे श्रेय आम्ही नववर्षात घेतले असून सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैध्य धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, मा.श्री विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा उप-विभाग मंगळवेढा यांचे मार्गदर्शनाखाली
सांगोला पोलीस ठाणेकडील भिमराय खणदाळे पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे, API मोरे, PSI पुजारी, दामिनी पथकाचे WPSI चव्हाण, उबाळे, ASI ढवणे यांनी व त्यांच्या टिमने सदरची कारवाई केली आहे.
0 Comments