google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..मित्रच बनले पक्के वैरी ! मद्यपान करताना जुन्या वादाचा विषय निघाला अन् दोन मित्रांनीच मित्राची केली 'गेम' सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

धक्कादायक..मित्रच बनले पक्के वैरी ! मद्यपान करताना जुन्या वादाचा विषय निघाला अन् दोन मित्रांनीच मित्राची केली 'गेम' सोलापूर जिल्ह्यातील घटना..

धक्कादायक..मित्रच बनले पक्के वैरी ! मद्यपान करताना जुन्या वादाचा विषय निघाला


अन् दोन मित्रांनीच मित्राची केली 'गेम' सोलापूर जिल्ह्यातील घटना..

सोलापूर: शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रानेच मित्राची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. युवराज प्रभुलिंग स्वामी (वय २०, रा. शिवगंगा नगर, शेळगी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून रिक्षाचालक मित्राची हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या २८ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत नागेश प्रभूलिंग स्वामी (वय १८ रा. शिवगंगा नगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून विजय ऊर्फ सोनू बनसोडे (वय-१९ रा. आदर्श नगर, शेळगी) अन्य एका अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज स्वामी हा रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावत होता. तो सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा (क्र.एमएच-१३ ५७७७) घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर तो दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास व्यवसाय करून घरी आला,

 भाड्यातून मिळालेले ३०० रुपये त्याने घरखर्चासाठी बहीण लक्ष्मी हिच्याकडे दिले. काही वेळाने युवराजला मित्र सोनू बनसोडे याचा फोन आल्यानंतर मी बाहेर जातो

 असे म्हणून तो घरातून बाहेर पडला. पायी चालत तो मित्र विजय ऊर्फ सोनू बनसोडे आणि एक अल्पवयीन मुलगा या दोघांच्या मोटारसायकलवर बसून गेला.

सायंकाळ होऊनही युवराज परत न आल्याने वडील आणि भाऊ नागेश यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री १०.३० वाजता तो आणि त्याचे मित्र नेहमी बसत असलेल्या निर्मल डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेत गेले 

तेव्हा युवराज स्वामी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. युवराजचा मृतदेह पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. त्यानंतर सोलापूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र यापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. रात्री दारू पिण्याचा प्लॅन करून तिघे 

दुपारीच मोटारसायकलवरुन गेले होते. दारू पित असताना पूर्वीच्या भांडणाचा विषय तिघांमध्ये निघाल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला अन् दोघांनी स्टीलच्या स्टॅन्डने कपाळावर वार करून त्याची हत्या केली.

Post a Comment

0 Comments