google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी महेश कोळीसह एकजण 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; गुन्ह्यात असलेले नाव कमी करण्यासाठी घेतले पैशांचे बंडल

Breaking News

मोठी बातमी! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी महेश कोळीसह एकजण 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; गुन्ह्यात असलेले नाव कमी करण्यासाठी घेतले पैशांचे बंडल

मोठी बातमी! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी महेश कोळीसह एकजण 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले;


गुन्ह्यात असलेले नाव कमी करण्यासाठी घेतले पैशांचे बंडल
 

मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल असले अर्ज चौकशीवरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यात मधून यातील तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी 5 लाखांची लाच घेताना

पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश राचप्पा कोळी (वय ४३ वर्षे, ९०५) व वैभव रामचंद घायाळ (वय-३२ वर्षे पो.शि./६२४) दोन्ही नेमणुक मंगळवेढा पोलीस ठाणे) यांना सांगली लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली

या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा एक गंभीर मुद्दा उघडकीस आला आहे. पोलिसांच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकाराने केवळ प्रशासनाची प्रतिष्ठा धक्का बसला नाही, तर सामान्य लोकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वासही कमी झाला आहे.

या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची गंभीर स्थिती व त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता स्पष्ट झाली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे काम अधिक कठोर बनवून अशा घटनांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे.

या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून, लोकांनी न्याय व्यवस्था व पोलिस यंत्रणेवर अधिक विश्वास ठेवावा, यासाठी कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी, तसेच तक्रारदार यांचे इतर नातेवाईक यांना गुन्हयामध्ये अटकपूर्व जामीनसाठी आणि इतर सर्व सहकार्य करण्यासाठी 10 लाखांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून सदर माहिती दिली होती. यावेळी तक्रारदाराकडून 5 लाखांची लाच स्वीकारताना महेश राचप्पा कोळी, वैभव रामचंद घायाळ यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही घटना पोलीस दलाच्या कामकाजावर काळा डाग ठेवणारी असून, त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित करते.

लोकांचा पोलिस यंत्रणेशी विश्वास उधळला जात आहे, त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. लाचलुचपत विरोधी विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, श्रीमती शितल जानवे-खराडे, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे,

 यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्री. उमेश पाटील, पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार खाडे, पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक

 ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर व मोबाईल नंबर ९५५२५३९८८९ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments