खळबळजनक... विद्यार्थ्यांसह काही शिक्षकांचे शाळा आणि कॉलेज परिसरात
सेल्फी आणि ठुमके मारलेल्या रिल्स ; संस्थापक व प्रशासनाचे दुर्लक्ष शाळा की धर्मशाळा ; पालक वर्गातून संताप
सांगोला :- विद्यार्थ्यांना मोबाईल पासून लांब राहण्याचा सल्ला देणाऱ्या ज्ञान मंदिरातच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी काढलेल्या सेल्फी आणि ठुमके मारलेल्या
रिल्सला पाहून पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. संस्थापक व संबंधित वरिष्ठ प्रशासन यांचे दुर्लक्ष असल्याने
हा प्रकार कॉलेज व शाळास्तरावर घडत असल्याने, विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही गांभीर्य नसावे का असा प्रश्न उपस्थित करीत, शाळा की धर्मशाळा असा सवाल पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.
स्नेहसंमेलन व इतर शाळा स्तरावरील काही कार्यक्रम वगळता, इतर वेळी सांगोल्यातील काही शाळा कॉलेज वरील शाळेतील विद्यार्थ्यांसह
आता शिक्षक ही शाळा आणि शाळा परिसरात सोशल मीडियावरील व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या रील्सवर ठुमके मारताना दिसून आहेत.
यानिमित्ताने शिक्षणाच्या नियमावलीसह गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभा राहत असताना, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे रिल्स तुफान व्हायरल होत असल्यामुळे पालक वर्गातून शाळा की धर्मशाळा असा सवाल केला जात आहे.
सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकाला सेल्फी आणि रिल्सने भुरळ पाडली आहे. गुड मॉर्निंग पासून ते गुड नाईट पर्यंत चा प्रवास हा सोशल मीडियावर व्यक्त होतो.
अशा या मल्टीमीडिया जीवनात ज्ञानमंदिर अर्थात शैक्षणिक संस्थेवर देखील सेल्फी आणि रिल्स बनू लागले आहेत.
भावी पिढीचे भविष्य घडवणाऱ्या शाळा आणि कॉलेज स्तरावर फिल्मी स्टाईलने विद्यार्थी रिल्स बनवतात. एवढेच नव्हे तर आता शिक्षक ही कमी नाहीत. यामुळे शिक्षण देणारे ज्ञान मंदिर सेल्फी पॉईंट आणि रिल्स पॉईंट बनू पाहत आहेत.
दरम्यान शाळा स्तरावर अनेक मान्यवरांच्या प्रबोधनातून विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर अनेकदा मार्गदर्शन केले जात असते. याबाबत त्या त्या कॉलेज आणि शाळा स्तरावरून त्या मान्यवराच्या
मार्गदर्शनाची प्रसिद्धी आणि प्रचार केला जातो. परंतु त्याचे अनुकरण करण्यामध्ये अनेकदा काही शाळा आणि कॉलेज दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा कितपत फायदा झाला
याबाबत ही शंका उपस्थित केल्या जात आहेत. शैक्षणिक संस्थेकडे निश्चितपणे ज्ञानाचे मंदिर म्हणून पाहिले जाते त्याचे पावित्र्य या पुढील काळात जपण्यासाठी संस्थाचालकांनी पुढाकार घ्यावा
तसेच शिक्षकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपण ज्ञान मंदिरामध्ये आहोत याचे भान ठेवावे आणि यावर संस्थाचालक व संबंधित प्रशासनाने याला निर्बंध घालावेत अशी मागणी पालक वर्गातून जोर धरत आहे.
0 Comments