धक्कादायक... एक वर्षाच्या चिमुरड्याला फाशी देत स्वतः आईनेही संपवले जीवन; लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसले अन्..
दुपारी कुमार दुपारी जेवण्यासाठी घरी आले. त्यावेळी त्यांना दरवाजा आतून बंद दिसला. बराच वेळ दार वाजवून सुद्धा आतून प्रतिसाद न मिळाला नाही.
कर्जत : तालुक्यातील खांडवी येथे एक वर्षाच्या चिमुरड्याला फाशी देत स्वतः फाशी घेत आईने जीवनयात्रा संपवली.
हा अपघात की घातपात, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
खांडवी येथील व्यवसायाने चालक असलेले कुमार परशुराम कांबळे (वय २४) यांचा साक्षी कुमार कांबळे (वय २३) यांच्याशी विवाह (Marriage) झाला होता.
त्यांना स्वरूप नावाचा मुलगा झाला. काही दिवसापूर्वी स्वरूपचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा केला.बुधवारी (ता.२२) दुपारी कुमार दुपारी जेवण्यासाठी घरी आले.
त्यावेळी त्यांना दरवाजा आतून बंद दिसला. बराच वेळ दार वाजवून सुद्धा आतून प्रतिसाद न मिळाला नाही. त्यांनी शेजारीच राहत असलेल्या सासूला बोलून आणले.
त्यांनी खिडकीतून डोकावले असता साक्षी आणि स्वरूप (वय १) घरातील अँगलला फाशी घेत लटकलेल्या अवस्थेत दिसले.
याप्रकरणी किशोर कांबळे यांनी खबर दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल भोसले हे करीत आहेत.


0 Comments