google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला रायडर्स वतीने सांगोला- गोवा- सांगोला सायकल राईड यशस्वीरीत्या पुर्ण. सांगोला सायकलर्स क्लबचा निसर्ग संवर्धन उपक्रम

Breaking News

सांगोला रायडर्स वतीने सांगोला- गोवा- सांगोला सायकल राईड यशस्वीरीत्या पुर्ण. सांगोला सायकलर्स क्लबचा निसर्ग संवर्धन उपक्रम

सांगोला रायडर्स वतीने सांगोला- गोवा- सांगोला सायकल राईड



यशस्वीरीत्या पुर्ण. सांगोला सायकलर्स क्लबचा निसर्ग संवर्धन उपक्रम

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला सायकलर्स क्लबच्यावतीने सांगोला- गोवा- सांगोला राईड निसर्गाचा मनमुराद आनंद घेत 877 किमीची यशस्वीरीत्या सायकल राईड पूर्ण झाली.

श्रीदत्त जयंतीचे दिवशी रायडर्सनी पहाटे 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारुढ पुतळ्याचे दर्शन घेऊन सुरूवात केली.

जूनोनी, नागज,शिरढोण मिरज मार्गे नर्सोबावाडी येथे कृष्णाकाठी स्नान करुन पादुकांचे दर्शन घेऊन कुरुंदवाड,बोरगाव(कर्नाटक), बेडकिहाळ, आकुळ मार्गे निपाणी येथे रायडर्स 175 किमीचा दिवसभरातील टप्पा पुर्ण करून

 आम्ही येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकात पोहचलो. येथील निवासाची सोय निपाणी सायकलर्स कलबच्या वतीने करण्याय आली. दुसऱ्या दिवशीचा टप्पा सूरू झाला अन् पहाटेच आम्ही

 कोल्हापूर- बेंगलोर महामार्गाने निघालो  निपाणी शहराबाहेरील तीव्र चढ असलेला घाट  चढण करत निघालो, शेवटी आम्ही दीड तासात कसातरी गोवा वेस घाट सर केला. उत्तुर, गडहिंग्लज,आजरा येथील

 छोटे- मोठे घाट पुर्ण करत महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण आंबोलिमध्ये पोहचलो येथील निसर्ग, डोंगरदऱ्या बघून आमचा दिवसभराचा थकवा नाहीसा झाला. येथील धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला

 नंतर आंबोली घाट उतरत सावंतवाडी दिशेने निघत वेडी वाकडी वळणे अवघड घाट 25 किमीचा उतरत विविध पक्ष्यांचे किलबिलाट ऐकत, निसर्गाची अद्भुती घेत सावंतवाडीकरत बांदा या शहरात 130 किमी ची राईड करत पोहचलो.

तिसऱ्या दिवशी बांदा- पणजी (गोवा मुंबई )महामार्गने प्रवास करत पत्रादेवी मार्गे पेडणे शहरात प्रवेश केला. या गावातून संपूर्णपणे समुद्रकिनारे बाघा, कलंगुट, मिरामार अशे अनेक किनारे पहायला मिळाले त्यानंतर पणजी, जुन्या गोव्यातील मंदिरे, चर्च अशा 

ऐतिहासिक, पर्यटन विविध स्थळांना भेटी देऊन प्रदूषणमुक्तीचा,निसर्ग संवर्धनचे महत्व यविषयी सायकलींग द्वारे प्रबोधन केले.

परतीच्या प्रवासात कुडाळ,कणकवली, फोंडा, दाजीपूर अभयारण्य,राधानगरी मार्गे कोल्हापुरात राईड पोहचली, कोल्हापूर -सांगोला 155 किमी अंतर रायडर्सनी रेकॉर्ड ब्रेक विना थांबा 11तासात यशस्वीरित्या हे अंतर पूर्ण केले.

 या सायकल प्रवासामध्ये प्रकाश खडतरे, माधव शिंदे, बाळकृष्ण टापरे या रायडर्सनी हे अंतर पार करून जागोजागी निसर्गसंवर्धनाची जागृती केली.

चौकट:-

सध्या धावपळीच्या जीवनात कोणालाच आरोग्य करिता वेळ नसल्याने प्रत्येक जण वाहनांचा वापर करीत असल्याने प्रदूषण वाढत आहे याच्या उलट आम्ही सायकलवर

सांगोला- गोवा- सांगोला राईड करण्यामागचा हेतू पर्यटन, धार्मिक ,ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना कमीत- कमी वाहनांचा वापर करने गरजेचे आहे तरच येथील निसर्ग, समुद्रकिनारे, धबधबे भविष्यात 

आपन पुढच्या पिढीला दाखवू शकु अन्यथा कचरा, वाहनांचे प्रदूषणाने येथील अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. यासाठी सांगोला सॉयकलर्स क्लबच्या माध्यमातुन आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आहे.

निलकंठ शिंदे सर, सायकल राईडर सांगोला

Post a Comment

0 Comments