google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पेन्शनर संघटनेबरोबर ज्येष्ठ नागरिक संघटनेतही सर्वांनी भाग्य घ्या - मा. प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले

Breaking News

पेन्शनर संघटनेबरोबर ज्येष्ठ नागरिक संघटनेतही सर्वांनी भाग्य घ्या - मा. प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले

पेन्शनर संघटनेबरोबर ज्येष्ठ नागरिक संघटनेतही सर्वांनी भाग्य घ्या - मा. प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी आज बारा टक्के प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे असून, दरवर्षी पेन्शनर डे साजरा करा कारण कृतज्ञ ता व्यक्त करण्याचा तो दिवस असून, पेन्शनर संघटनेबरोबर ज्येष्ठ नागरिक संघटनेत ही भाग घ्या व सेवानिवृत्तीनंतर 

आनंद लुटा असे मा. प्राचार्य डॉक्टर कृष्णा इंगोले यांनी पेन्शनर डे प्रसंगी अध्यक्षीय भाषणात सांगोला येथे मत व्यक्त केले. सांगोला तालुका पेन्शनर संघटनेमार्फत सांगोला येथील कार्यालयात 

पेन्शनर डे साजरा करण्यात आला. यावेळी घरात एक लहान मुलगा सांभाळताना किती अडचणी येतात मग 50 ते 60 विद्यार्थी एका वर्गात लहान असताना सांभाळणे 

अवघड आहे व त्यामुळे शिक्षकांच्या कामाचे मोजमाप करता येत नाही व आज अनेक संस्कारक्षम विद्यार्थी उच्च पदाव काम करतात त्यात खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षकाचा सिंहाचा मोठा वाटा आहे

 असे मत डॉक्टर कृष्णा इंगोले यांनी व्यक्त केले. यावेळी पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या हस्ते डॉक्टर कृष्णा इंगोले यांचा सत्कार करण्यात आला. 

     सदर प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव साबळे, केंद्रप्रमुख शिवाजीराव करांडे, शिक्षक विनायक कुलकर्णी, अण्णासाहेब मदने, कवी शिवाजी बंडगर, आनंद वाघमारे, दिनकर घोडके यांनी मनोगत व्यक्त केले,

 तर संघटनेच्या कार्यालयास मदत केलेले शिक्षक महादेव चौगुले, सुभाष दिघे, अण्णासाहेब मदने, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, जागा मालक अजितसिंह माने यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

 यावेळी पेन्शनर संघटनेचे उपाध्यक्ष जयवंतराव नागणे, सल्लागार शंकर सावंत, सर्व पदाधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संघटनेचे सल्लागार सिद्धेश्वर झाडबुके यांनी आभार मानले.   

आपले कामकाज हे वडीलधारकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पेन्शनर संघटनेचे कोणतेही काम पेंडिंग राहणार नाही याची ग्वाही देतो. गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले

Post a Comment

0 Comments