मोठी बातमी.. सांगोला तालुक्यातील महूद या गावात जातीवाचक शिवीगाळ करून
मारहाण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल
सांगोला : जातिवाचक शिवीगाळी व दमदाटी करीत फिर्यादीच्या छातीवर पाय देवून लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकजणावर अनुसूचित जाती जमाती
कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगोला तालुक्यातील महूद या गावात घडली आहे.
याबाबत अनिता नितीन कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजय किसन ढाळे (रा. महुद ता. सांगोला, जि-सोलापूर) याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून चकवा देत असलेल्या आरोपीस पोलिसांनी महुद येथील ओढ्यात ताब्यात घेतले आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की,
फिर्यादी अनिता नितीन कांबळे (वय 32) ह्या शेती करतात. 07/12/2024 रोजी सकाळी नऊच्या सुमारास फिर्यादीचा नवरा नितीन माणीक कांबळे वय 40 वर्षे व फिर्यादी त्यांच्या मोटार
सायकलवरुन महुद गावाकडे जात असताना काळेल बाबा यांचे शेताजवळ महुद येथे आले असता संजय किसन ढाळे (रा. महुद ता. सांगोला) याने नितीन कांबळे यास "तुला किती वेळा सांगीतले
की, शारु कांबळे हिच्याशी बोलु नको, चांभारड्या तुला दुसरा रस्ता नाही का, तिचे घरासमोरुन का येतो" असे म्हणुन जातिवाचक व घाणघाण शिवीगाळी व दमदाटी केली.
नितीन यांच्या छातीवर पाय देवून हातातील लाकडी दांडक्याने नवरा नितीन यास जिवे ठार मारण्याच्या उददेशाने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. नितीन कांबळे हे सध्या लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपुर येथे बेशुध्दावस्थेत आहेत.
फिर्यादी अनिता कांबळे ह्या पतीला सोडवण्याकरीता मध्ये गेल्या असता आरोपी संजय ढाळे याने फिर्यादीलाही दांडक्याने पाठीत मारुन जखमी केले आहे.
संजय किसन ढाळे याच्या विरुध्द तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.
0 Comments