google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 व्यावसायिक शिक्षण काळाची गरज: माजी नगराध्यक्षा राणीताई माने

Breaking News

व्यावसायिक शिक्षण काळाची गरज: माजी नगराध्यक्षा राणीताई माने

व्यावसायिक शिक्षण काळाची गरज: माजी नगराध्यक्षा राणीताई माने


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/ प्रतिनिधी: सध्या सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून वाढत्या शिक्षितांना सरकारकडून 

नोकऱ्या पुरवणे हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहे. प्रत्येक गावातून शेकडो तरून उच्च शिक्षण घेऊन

 नोकरीच्या शोधात आहेत. शिक्षित तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करून देणे सरकारसमोर मोठे आव्हानात्मक काम आहे. अशा परिस्थितीत तरुणांनी दहावीनंतर व्यवसायिक शिक्षण घेऊन

 उद्योगधंद्याकडे व स्वतःच्या व्यवसायामध्ये करिअर करण्याची गरज निर्माण झाली आहे. आज दहावीनंतर आय.टी.आय तसेच छोट्या मोठ्या उद्योगासंदर्भात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था पुढे आलेल्या आहेत. 

परंतु व्यवसाय शिक्षण घेण्याकडे तरुणांचा कल कमी आहे. तो वाढला पाहिजे व प्रत्येक गावामध्ये छोटे-मोठे व्यवसाय सुरू झाले पाहिजेत तरच समाजाची प्रगती व कुटुंबाची प्रगती साधणे शक्य होणार आहे.

 त्यासाठी व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज निर्माण झाली आहे असे मत सांगोला नगरपरिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

सुशिक्षित बेरोजगांचा अतिरिक्त भार हा शेती क्षेत्रावर अवलंबून असून त्याला शेती शिवाय पर्याय उरला नाही. 

अशा तरुणांनी छोट्या मोठ्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन एक विशिष्ट कौशल्य प्राप्त करावे व त्यातून आपला उद्योग व्यवसाय उभा करून स्वावलंबी जीवन जगणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.

 अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाच्या नोकरीच्या  भरोशावर न बसता आपला स्वतःचा उद्योग व व्यवसाय सुरू करून कुटुंब, 

गाव, तालुका समृद्ध करावा व आपली स्वतःची प्रगती साधावी असे आवाहन माजी  नगराध्यक्षा राणीताई माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments