खळबळजनक..सांगोला तालुक्यातील बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:-कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना मागील 4 ते 5 वर्षापासून रुग्णांच्या जिवीतास व आरोग्यास धोका होईल
याची जाणीव असतानाही लोकांची फसवणुक करुन वैदकिय व्यवसाय करणार्या एका बोगस डॉक्टरवर सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आहे.
डॉ. प्रविण विरुपक्षपा बडगीरे (रा. लक्ष्मीनगर दंडाचीवाडी ता. सांगोला जि. सोलापुर) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टराचे नाव असून तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉ. अविनाश खांडेकर यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 11 डिसेंबर 2024 रोजी 2 वाजणेचे सुमारास मौजे लक्ष्मीनगर दंडाचीवाडी येथे फिर्यादी डॉ.अविनाश खांडेकर यांनी भेट दिली
असता येथे 4 ते 5 वर्षापासुन भोगस डॉक्टर प्रविण बडगीरे हा गावातील मारुती मंदीराजवळ स्वःताचे घरामध्ये खाजगी वैद्यकिय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांच्याकडे महाराष्ट्र वैदयकिय व्यवसाय करणेसाठी
कोणत्याही व्यक्तीला इंडीयन मेडीकल कौन्सील अॅक्ट 1956 किंवा महाराष्ट्र मेडीकल प्रक्टीशनर अॅक्ट 2000 प्रमाणे संबंधीतांकडे नोंदणी करणे व त्यासोबत शैक्षणीक पात्रता असणे आवश्यक आहे,
परंतु या दोन्ही गोष्टी भोगस डॉक्टर प्रविण बडगीरे यांच्याकडे नव्हत्या. त्यामुळे त्यानी लक्ष्मीनगर दंडाचीवाडी ता. सांगोला येथे मागील सुमारे 4 ते 5 वर्षापुर्वीपासुन
विनापरवाना, बेकायदेशीरपणे, पात्रता नसताना वैदकिय व्यवसाय करुन रुग्णांच्या जिवीतास व आरोग्यास धोका होईल याची जाणीव असतानाही लोकांची फसवणुक केली आहे.
म्हणुन बोगस डॉ. प्रविण बडगीरे यांच्याविरुध्द इंडीयन मेडीकल कौन्सील अँक्ट 1956 चे कलम 15 व महाराष्ट्र मेडीकल प्रक्टीशनर अॅक्ट 1961 चे कलम 33 (2) व
भारतीय न्याय.संहिता कलम 318(4) वगैरे प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पुढील तपास पोसई जाधव हे करीत आहेत.
0 Comments