google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनास आज पासून प्रारंभ

Breaking News

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनास आज पासून प्रारंभ

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनास आज पासून प्रारंभ


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण

 समारंभ सन २०२४-२५ गुरुवार दि.२६ डिसेंबर ते शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे अशी माहिती प्राचार्य अमोल गायकवाड यांनी दिली.

यामध्ये गुरूवार दि.२६ डिसेंबर रोजी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी शिक्षक दिन आयोजित केला असून याच दिवशी दुपारी २ वाजता प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाटिका

 व ज्युनिअर कॉलेज विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता विद्यार्थी अल्पोपहार व फिशपॉंडस् अर्थात शेलापागोटे हा कार्यक्रम होणार आहे. 

व सकाळी दहा वाजता फन फेअर, विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये फनफेअरचे उद्घाटन वाहतूक नियंत्रक 

सांगोला आगार सागर कदम यांच्या शुभहस्ते व संस्थासचिव म.शं. घोंगडे यांचे उपस्थितीत होणार आहे.विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.अभयसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते व संस्था खजिनदार शंकरराव सावंत यांचे उपस्थितीत होणार आहे.

कला प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण व कृषी विकास प्रतिष्ठान,मेडशिंगी संचालिका अनिता इंगवले यांच्या शुभहस्ते व संस्था कार्यकारिणी सदस्या सौ.शीलाकाकी झपके यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे 

तर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका जि. प. प्रा. शाळा नंबर ३ जबीन शेख यांच्या शुभहस्ते व संस्था सदस्य ॲड विजयसिंह चव्हाण यांचे उपस्थितीत होणार आहे.

 व दुपारी २ वाजता प्रशाला विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आह.तसेच दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ होणार असून 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पॅराॲथलेटिक्स - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मेडल प्राप्त खेळाडू सचिन खिलारी हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके हे भूषविणार आहेत.

स्नेहसंमेलनानिमित्त तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरिकांनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, 

असे आवाहन प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे,

मच्छिंद्र इंगोले,स्नेहसंमेलन प्रमुख प्रशाला बापूसो सावंत, स्नेहसंमेलन प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा.तानसिंग माळी ,विद्यार्थी मुख्याध्यापक मोहेज नूरमहमद मणेरी, 

प्राचार्य गुरूनाथ संतोष व्हटे, स्नेहसंमेलन जनरल सेक्रेटरी सुमित विठ्ठल कोळवले,शिवराज जयवंत नवले, विद्यार्थीनी प्रतिनिधी वैष्णवी विजय शेंबडे,साक्षी बापूसो गायकवाड यांनी केले आहे.

प्रमुख पाहुणे सचिन खिलारी हे राष्ट्रीय पॅराॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये 9 वेळा पदक विजेते आहेत. (F46/ऑर्थोपेडिकली अक्षम) आशियाई रेकॉर्ड होल्डर आहेत.

 आणि भारतातील नंबर १ पॅराऍथलीट, आशियातील नंबर १ आणि शॉट पुटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर १ आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्गीकृत (F46)पॅराॲथलेटिक्स आणि आंतरराष्ट्रीय पदकधारक आहेत. 

त्यामुळे त्यांची ही प्रेरणा देणारी धवल यशोगाथा सांगोला विद्यामंदिरच्या प्रांगणात शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४' रोजी सकाळी ११ वाजता पारितोषिक वितरण समारंभामध्ये ऐकायला मिळणार...

Post a Comment

0 Comments