google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! भावकीचा वाद जीवावर उठला, आई अन् मुलाला संपवलं आणि मग.. सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

धक्कादायक! भावकीचा वाद जीवावर उठला, आई अन् मुलाला संपवलं आणि मग.. सोलापूर जिल्ह्यातील घटना..

धक्कादायक! भावकीचा वाद जीवावर उठला, आई अन् मुलाला संपवलं आणि मग.. सोलापूर जिल्ह्यातील घटना..


बार्शी तालुक्यातील भोयरे गावात दुहेरी हत्येची घटना घडली आहे. ज्यामुळे सोलापूर हादरून गेलं आहे. 

शेताच्या वादातून युवक आणि आईचा मृत्यू झाला असून, वडील यात गंभीर जखमी झाले आहेत. 

सागर पाटील, सिंधू पाटील असं मृत व्यक्तीचे नाव असून, किसन पाटील असे गंभीर जखमी झालेल्या वडीलांचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बार्शी तालुक्यातील भोयरे गावात पाटील भावकीत वाद झाला. हा वाद शेतीच्या वाटेच्या वादातून झाल्याचं समजते. किसन पाटील, सागर पाटील आणि सिंधू पाटील हे कामानिमित्त शेतात गेले होते. शेतातून घराकडे परत येत असताना,

 त्यांच्या घरासमोर हल्ला घडला. पुतण्यानेच धारदार हत्यारानं, चुलत्याचा मुलगा आणि त्याची आई अशा दोघांना ठार केले. यात किसन पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

आतापर्यंत पोलीस ठाण्यात शेतीच्या वादाची महसूल अथवा पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र, हा प्रकार पाटील भावकीत शेतीच्या वादावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 सागर पाटील (वय वर्ष ३०) आणि सिंधू पाटील (वय वर्ष ५५) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. तर किसन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शीतील रूग्णालयात उपचार सुरू आहे.

घटना घडल्यानंतर प्रभारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, बार्शी शहरचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

 या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात सौदागर दादा पाटील याच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक अजित पाटील यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments