मोठी बातमी.. वाणिचिंचाळे ते जवळा रस्त्यावर ट्रॅक्टरसह 20 हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त ; सांगोला वन विभागाची कारवाई
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : वाणिचिंचाळे ते जवळा रस्त्यावर सोमवार दि.23 रोजी सकाळी 07.30 वा.च्या दरम्यान फिरती करत असताना
ट्रक्टर क्र.MH 13 बी आर 4252 विनापरवाना आंबा इमारती नग 6 वाहतूक करत असताना जप्त केला आहे. सांगोला वन विभागाने ही कारवाई केली आहे.
वाणिचिंचाळे ते जवळा रस्ता येथे रोजी सकाळी 07.30 वा फिरती करत असताना ट्रक्टरमध्ये आंबा इमारती नग 6 व त्याचे 1.207 घ.मी दिसुन आले.
वाहन चालक यांचेकडे वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना नसल्याचे दिसुन आले. याबाबत पंचनामा व जबाब घेवून बाजार भाव किंमत अंदाजे 20 हजार रुपयांचे
लाकूड व दिगंबर ऐडवे रा. निंबूनी ता. मंगळवेढा (ट्रक्टर मालक), बिराप्पा ऐडवे रा. निंबूनी ता. मंगळवेढा (लाकुड व्यापरी), जगू नरळे रा.निंबूनी ता. मंगळवेढा (शेतकरी),
अमोल निमग्रे रा. जवळा (आंबा इमारती नग विकत घेणार) यांनी विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक केले बद्दल लाकुड मालासह वाहन जप्त केले. या चार व्यक्तीवर प्रथम वनगुन्हा नोंद केला आहे.
सदरची वृक्षतोड ही निंबूनी ता. मंगळवेढा येथे मालकी क्षेत्रातील आहे. मंगळवेढा तालुक्यातील लाकुड विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक करून जवळा येथे
विक्रीसाठी आंबा इमारती नग 6 आले होते. त्यामुळे कारवाई केली असल्याचे वन विभागाकडून सांगितले आहे.
वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी. वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी,
अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा तुकाराम जाधवर यांनी दिला आहे.
सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे-श्री. एन. आर. प्रवीण, मा. उपवनसंरक्षक, सोलापूर श्री. लेफन्टंट कुशाग्र पाठक व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा),
सोलापूर श्री.व्ही.एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची कारवाई श्री. तुकाराम जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व वनपाल जुनोनी एस.एल. वाघमोडे, वनरक्षक घेरडी एस.एस. मुंढे यांनी केली.
0 Comments