google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात अदृष्य शक्तीचा बऱ्याच जणांनी धसका घेतलेला दिसतोय

Breaking News

सांगोला तालुक्यात अदृष्य शक्तीचा बऱ्याच जणांनी धसका घेतलेला दिसतोय

सांगोला तालुक्यात अदृष्य शक्तीचा बऱ्याच जणांनी धसका घेतलेला दिसतोय


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

विधानसभेला डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख यांचा विजय झाला व विजयानंतर बोलताना आमदार‌ बाबासाहेब देशमुख वारंवार म्हणतात.

माझ्या विजयात‌ शेतकरी कामगार‌ पक्षासह अनेक‌ पक्ष अनेक संघटना व काही अदृष्य शक्तीचा सहभाग आहे..आता ही अदृष्य शक्ती कोण ?या‌ वरुन अनेकांना झोप लागेना झाली आहे.

  काहींनी‌ शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विचार सरणी जोपसणारा पक्ष‌ प्रतिगामी पक्षाशी अंतर्गत हातमिळवणी केली आहे आशा प्रकारचे विश्लेषण करु‌ लागलेत...असो...

  आता या सर्वांना आम्ही एकच प्रश्न‌ विचारतो ज्या वेळेस भाजपचे सरकार आले तेंव्हा मतदानाला‌ गैरहजर कोणत्या पक्षाचे आमदार राहीले होते‌ ते सांगा ? शिवसेना ,काॅंग्रेस  व राष्ट्रवादी‌ कांग्रेस यांचे सरकार आले

 तेंव्हा पुरोगामी व प्रतिगामी गोष्टी कुठे गेलेल्या ते ही राहुद्यात आता गेले दोन तिन वर्षापुर्वी  जे‌ सरकार आले

 व काही दिवसांत पुन्हा धर्म निरपेक्ष पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला तेंव्हा धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी  -प्रतिगामी सारं चालले...

    राजकारणापलीकडे सुध्दा काही संबंध‌ आसतात.व ते जपणे गरजेचे असते...

ते ही विश्वासाने ..स्व‌.आबासाहेबांनी शेवटपर्यंत राजकारणा पलीकडे सर्वांशी सलोख्याचे संबंध जपले होते...

हे कित्येक निवडणुकीत आबासाहेबांना ज्ञात -अज्ञात अनेकांनी सहकार्य केल्याचे आपणास माहीतच असेल.

तसेच संबंध आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी सुध्दा जपले आहेत

 हे संपुर्ण राज्याला‌ माहीत झाले आहे..आशा संबंधामुळे कांहीं लोक निवडणुक असो..की ईतर काही बाबतीत आबासाहेबापासुन ते बाबासाहेबापर्यंत  सहकार्य  करीत आले आहेत..

    आता झालय अस इतरांनी कुणाचेही सहकार्य   घेतले‌ तर सगळ्यांना चालतंय मात्र आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आंमच्या विजयात काही अदृष्य शक्तीचा हात आहे 

आस म्हणाले तरी नुसता आगडोंब उसळला...ज्यांनी शेकापक्षाला‌ मतदान केले नाही हो केले नाही

 त्यांनाच शेकापक्षाच्या विचारधारेचे...धर्मनिरपेक्षतेची फारच चिंता‌ लागली आहे..शेकापक्ष हा केडर बेस पार्टी आहे सर्वांच्या मताचा विचार करुन कोणताही निर्णय घेतला जातोय‌ हे‌ लक्षात ठेवावे....आपलाच

भाई चंद्रकांत सरतापे प्रसिध्दी प्रमुख शेकाप

Post a Comment

0 Comments