google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, सरपंचांसह वीस सदस्य अपात्र - सांगोला तालुक्यातील सदस्याचाही समावेश

Breaking News

खळबळजनक..सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, सरपंचांसह वीस सदस्य अपात्र - सांगोला तालुक्यातील सदस्याचाही समावेश

खळबळजनक..सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, सरपंचांसह वीस सदस्य अपात्र - सांगोला तालुक्यातील सदस्याचाही समावेश


सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले आहे. 

त्यामध्ये काही सरपंचांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली. या अपात्र सदस्यांमध्ये सांगोला तालुक्यातील हे काही ग्रामपंचायतीमधील सदस्य तसेच सरपंचांचा समावेश आहे.

नेमके कोणत्या गावातील सदस्य, सरपंच अपात्र झाले ते खालीलप्रमाणे

दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्याने अपात्र करण्यात आले आहे. 

त्यामध्ये अंजली चव्हाण, नूरजहा हुसेन शेख, तेजश्री संजय गायकवाड, शांताबाई नागनाथ कांबळे, बलभीम शिवा खांडेकर यांचा समावेश आहे.

माढा

माढा तालुक्यातील रांझणी या गावातील तर तब्बल सात सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे. या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे.

 सोनाली पांडुरंग माने, रोहिदास दादासाहेब गायकवाड, नेताजी नामदेव चमरे, संगीता धनंजय पाटोळे, चंचला विजय पाटील, प्रीतम अक्षय पाटील, दिपाली तानाजी गायकवाड यांचा समावेश आहे.

बार्शी

बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या मनीषा सतीश कोतमीरे गीता प्रशांत आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमण केल्याने अपात्र करण्यात आले आहे.

सांगोला

सांगोला तालुक्यातील बामणी इथल्या अर्जुन भीमराव साळुंखे या सदस्याचा यामध्ये समावेश आहे. साळुंखे यांना तीन अपत्य असल्याने त्यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई झाली आहे.

अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी इथल्या सुरेखा दिलीप माळी यांचा यामध्ये समावेश आहे.

माळशिरस

माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील शालन चिंतू माने यांना तीन अपत्य असल्याने अपात्र ठरवले आहे.

करमाळा

करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता बापूराव पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य आशिष कल्याण गायकवाड यांना

 अतिक्रमण केल्याने तसेच करमाळा तालुक्यातीलच निमगाव (ह) लखन अरुण जगताप यांना अतिक्रमण व पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले आहे.

कारवाई झालेल्या सदस्यांना पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार असल्याचेही समजते.

Post a Comment

0 Comments