सांगोला तालुक्यातील कृषि योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा-कृषी अधिकारी दिपाली जाधव -
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे माननीय आयुक्त यांचे आदेशानुसार महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रति थेंब अधिक पीक या योजनांर्तगत अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरीता निधी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचन, तुषार सिंचन बाबींकरीता नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र येथे अर्ज करावा, असे आवाहन कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरल्यानंतर लवकरच लकी ड्रॉ पद्धतीने शेतकरी निवड यादी प्रसिद्ध होणार आहे,
तरी सदर प्रवर्गातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करुन ९० टक्केपर्यत अनुदानाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त क्षेञ सुक्ष्म सिंचनाखाली आणावेत,
असे आवाहन सांगोला तालुका कृषि अधिकारी श्रीमती दिपाली जाधव यांनी केले आहे. पाञ लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करुन लकी ड्राद्वारे योजनांचा लाभ घ्यावा.
महाडीबीटी वर अर्ज बाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधु व भगिनींनी संबंधित कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सांगोला यांचेशी संपर्क साधावा.
0 Comments