सभागृहामध्ये प्रवेश करतानाही सुरक्षा रक्षकांनाही सांगावे लागले मी बाबासाहेब देशमुख आहे..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आमदार बाबासाहेब देशमुख जेव्हा शपथ घेऊन बाहेर आले तेंव्हा काही प्रसारमाध्यमांशी ते बोलताना म्हणाले, मी सभागृहामध्ये जात असताना अनेक सुरक्षा रक्षकांनी मला अडवले..
व आपण कोण अशी विचारणा केली तेंव्हा मला त्यांना सांगावे लागले मी बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा मतदार संघातुन निवडुन आलो आहे…हे का सांगावे लागले कारण एकदम साधा पेहराव,
एकदम साधे राहणीमान त्यामुळे हे आमदार असतील असे सुरक्षा रक्षकांना वाटलेच नाही.कारण आमदार म्हटले की..पांढरी शुभ्र स्टार्च केलेली कपडे, पायात मोठ्या किंमतीच्या चपला किंवा बुट,
हातात मौल्यवान घड्याळ ,खिशाला महागड्या किंमतीचा पेन अशा थाटामाटात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख कुठेच बसत नसल्याने सुरक्षा रक्षकांनी आपण कोण आहात ?अशी विचारणा करणे काहीही गैर नाही.
आमदार म्हणुन काम करीत असताना मी सर्वसामान्य घटकांचे प्रतिनिधित्व करीत आहे. शेतकरी ,कष्टकरी ,दलित ,महिला यांच्या मुळे मला संधी मिळाल्याचे ज्यावेळी
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतले तेंव्हाच सर्व मतदारांना आपली निवड योग्य असल्याचे समाधान मिळाले तसेच जाणीव ठेवणार्या नेत्याला आपण पवित्र मत देऊन आमदार केले आहे,
याचे समाधान झाल्याची भावना सर्वत्र दिसुन येत होती. येणार्या काळात स्व.आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत जनतेला विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल करणार
असल्याचे आमदार साहेबांनी जाहीर केल्याने आपलेपणाची भावना नागरीकांमध्ये निर्माण झाली आहे.एखादे पद मिळाल्यावर नेता व नागरीक यांच्या मधील संवाद, संबंध यामध्ये बदल होत असतो
हे आपण अनेक ठिकाणी पाहतो परंतु आमदर डॉ.बाबासाहेब देशमुख निवडुन आलेल्या दुसर्या दिवसांपासुन जनमाणसात मिसळलेले पाहावयास मिळाले.अनेक खाजगी व सार्वजनीक कार्यक्रमात ते सहभागी होताना आपण पाहिले आहे.
आमदार होऊन कसलाच बदल झालेला नसल्याने प्रत्येकाला आपणच आमदार झाल्यासारखे वाटु लागले आसल्याची भावना निर्माण झाली असल्याचे मत भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले.
नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी जात असताना रयतेचे राजे ,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊनच पवित्र अशा सभागृहात पाय ठेवला व शपथ घेऊन
झाल्यावर जय हिंद..जय महाराष्ट्र व जय भिम चा नारा दिला आणि संपुर्ण सांगोला मतदार संघात एकच एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली.
प्रथम छत्रपती शिवरायांना वंदन नंतर जय हिंद-जय महाराष्ट्र व जय भिमचा नारा दिला यातुन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख हे आमदार म्हणुन सर्व जनतेची सेवा कशा पध्दतीने करणार आहेत
याची प्रचितीच आली. प्रथमता आमदार होऊन सुध्दा न डगमगता आबासाहेबाप्रमाणेच खणखणीत आवाजात ज्या वेळेस शपथ घेतली तेंव्हाच स्व आबासाहेबांची आठवण मतदार संघासहित संपुर्ण महाराष्ट्राला झाली.
परंतु ज्या जनतेनी आमादर डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आपले पवित्र मत देऊन नेतृत्व करण्याची संधी दिली त्यांना मात्र ही अभिमानाची गोष्ट आहे.कारण आपण निवडुन दिलेला लोकप्रतिनिधी सभागृहात शपथ घेण्यासाठी जात असताना जसा आहे
तशाच वेशात गेला व आमदार झाल्यावर जो काही विशिष्ठ बदल होतो तो कुठलाच बदल आपल्या नेत्यांमध्ये दिसलेला नसल्याने जनतेला अभिमान व सार्थक वाटल्याशिवाय राहत नाही असे मत भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले.


0 Comments