धक्कादायक ..सांगोला शहरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- अज्ञात कारणावरून विवाहित महिलेने राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, दुपारी २ च्या सुमारास मिरज रोड, सांगोला येथे घडली.
लक्ष्मी गणेश चोथे (२२, रा. मिरज रोड, सांगोला) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल खुरे यांनी खबर दिली असून पोलिसांनी, अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सांगोला-मिरज रोड येथील गणेश चोथे हा मोलमजुरीच्या कामासाठी घराबाहेर गेला होता. पत्नी लक्ष्मी चोथे हिने रविवारी दुपारी राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेतला.
0 Comments