आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी तालुक्यातून प्रथम चिंचोली गावातून
प्रारंभ १०० झाडे लावून वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात चिंचोली गावातून जेवढं मतांचे लीड तेवढी झाड लावणार ; सरपंच दत्तात्रय नाना बेहेरे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला विधानसभा निवडणुकीत ज्या गावामधून जेवढं मताधिक्य तेवढी झाडे लावण्याचा संकल्प शेतकरी कामगार पक्षाचे आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे. त्यानुसार चिंचोली गावातून 1हजार 30 मतांचे लीड मिळाले
म्हणून सरपंच दत्तात्रय नाना बेहेरे यांच्या पुढाकाराने व शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी नेते मंडळींच्या सहकार्याने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे.
तालुक्यातील पहिल्याच चिंचोली गावातून विधानसभा निवडणुकीच्या संकल्पपूर्तीची सुरुवात करण्यात येत आहे. शुक्रवारी ग्रामपंचायत परिसर, खंडोबा मंदिर,
स्मशानभूमी व रस्त्याच्या दुतर्फे बाजूने एकाच दिवसात 100 वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली आहे. उर्वरित वृक्ष रोपांची लागवड लवकरच करणार असल्याचेही सरपंच दत्तात्रय बेहेरे यांनी सांगितले आहे.
सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर, वनरक्षक जी.बी. व्हरकटे, सरपंच दत्तात्रय बेहेरे, पोलीस पाटील हरिदास पाटील,
विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दादासाहेब आनंदा माने, माजी सरपंच लक्ष्मण बेहेरे, मारुती बेहरे, संजय शेजाळ, संतोष बेहरे यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
''काय झाडी काय डोंगर काय हाटील'' फेम माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगमुळे सांगोला तालुका मोठा फेमस झाला. यानिमित्ताने सांगोला विधानसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचा पराभव केला आणि निवडणूक निकालानंतर तालुक्यात झाडी झुडपे वाढावीत म्हणून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ज्या गावात
जेवढे मताधिक्य तेवढी झाडे लावण्याचा संकल्प केला. आणि त्या संकल्पनेनुसार शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वृक्षरोप भेट देण्याचे आवाहन केले होते.
तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी नेतेमंडळी यांनी शुभेच्छा देण्यासाठी वृक्षरोप भेट दिले. व गाव पातळीवर आपल्या गावातून जेवढे मताधिक्य तेवढी झाडे लावण्यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्प पूर्तीसाठी सर्वप्रथम चिंचोली गावातून सुरुवात झाली आहे. लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय बेहेरे यांनी पुढाकार घेतला
असून गावातून १ हजार ३० मताचे लीड दिले आहे तर 1 हजार 30 झाड लावून आमदार साहेबांची संकल्पपूर्ती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने वृक्ष लागवड मोहीम सुरू करण्यात आले असून, गावामध्ये इतर ठिकाणी उर्वरित वृक्ष लागवड करणार असल्याचेही सरपंच दत्तात्रय बेहरे यांनी सांगितले आहे.
0 Comments