google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक... सांगोला तालुक्यातील ऊस कारखान्यास घालण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड ऊस तोडण्यासाठी टोळी येईना ; शेतकरी चिंतेत

Breaking News

खळबळजनक... सांगोला तालुक्यातील ऊस कारखान्यास घालण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड ऊस तोडण्यासाठी टोळी येईना ; शेतकरी चिंतेत

खळबळजनक... सांगोला तालुक्यातील ऊस कारखान्यास घालण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड ऊस तोडण्यासाठी टोळी येईना ; शेतकरी चिंतेत


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- नुकतीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे शेतकरी आता आपला ऊस कारखान्यांस घालण्यासाठी धडपड करत 

असल्याचे चित्र तालुक्यात आहे. परंतु ऊस तोडण्यासाठी टोळी मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. निकालानंतर निवडणुकीचे वातावरण शांत होऊ लागले आहे. 

शेतकरी शिवारातील ऊस लवकरात लवकर साखर कारखान्यास घालण्यासाठी खटाटोप करत आहेत. यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुकीमुळे ऊस गाळाप हंगाम उशिराने सुरु झाला आहे. 

त्यामुळे येथील शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर जावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तालुक्यात ऊस टोळ्यांची संख्या कमी असल्याने अनेक शेतकर्‍यांना वेळेवर ऊस तोडणारी टोळी मिळत नाही. 

त्यामुळे शेतकरी ऊसटोळी, कारखान्यांकडे फेर्‍या मारत आहेत. दरम्यान, तालुका नाजिक असणाऱ्या साखर कारखान्यांकडे ऊस टोळ्या दाखल झाल्या आहेत. 

त्यांनी विविध गावात जाऊन ऊस तोडणी सुरु केली आहे. अनेक भागात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या अद्यापही दाखल होत आहेत. यामध्ये मांजरी, संगेवाडी, मेथवडे, बामणी, सावे, चिंचोली ,धायटी

 या भागात ऊस तोडणीसाठी आला असताना टोळी मिळेना अशी समस्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी शेतकरी कारखान्याकडे हेलपाटे मारत आहेत. 

याबाबत संबंधितांनी लक्ष घालून शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही या दृष्टीने ऊस तोडणी साठी टोळी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments