सांगोला तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारसह १३ पदे रिक्त;
कर्मचाऱ्यांवर वाढतोय कामाचा ताण सांगोला तहसील कार्यालयातील आस्थापनेवरील ३५ पदे मंजूर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :सांगोला तहसील कार्यालयातील आस्थापनेवरील मंजूर ३५ पैकी १३ पदे रिक्त आहेत.
नायब तहसीलदार, महसूल अधिकारी व शिपाई यांच्या रिक्त पदामुळे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.
तहसील कार्यालयातील तहसीलदार-१ नायब तहसीलदार-३ पुरवठा निरीक्षण अधिकारी -१ सहायक महसूल अधिकारी - ८ महसूल सहायक १७ अशी एकूण सुमारे ३० पदे मंजूर आहेत
तसेच तहसील कार्यालयातील आस्थापनेवर नायब तहसीलदार यांच्या मंजूर 3 पदांपैकी २ भरली असून १ रिक्त आहे तर सहायक महसूल अधिकारी यांच्या मंजूर ८ पैकी ८ पदे भरली आहेत.
महसूल सहायक यांच्या मंजूर १७ पैकी ९ पदे भरली असून ८ पदे रिक्त आहेत. शिपाई मंजूर ७ पैकी ३ भरले असून ४ रिक्त असल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
तहसील कार्यालय सांगोला येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत
सांगोला तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयाच्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी तहसील कार्यालयातील मंजूर व रिक्त पदांसह मनुष्यबळ कमतरता
व इतर सोयी सुविधा बाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शासन स्तरावरून लवकरच रिक्त पदे भरली जातील, असे आश्वासित केले.
तहसील कार्यालयातील विविध विभागातील रिक्त पदामुळे दैनंदिन कामकाजात अडचणी येतात त्यामुळे रिक्त पदाचा इतर कर्मचाऱ्यावर कामाचा ताण येतो
शासकीय पातळीवरून रिक्त पदे भरल्यास तहसील कार्यालयातील येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत व सुलभ होण्यास मदत होईल.
मा. संतोष कणसे - तहसीलदार, सांगोला.
0 Comments