सांगोला तालुक्यातील शेतकऱ्याचा हिवाळ्यातील खरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग; एकरी १२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : खरबूज पिकाची लागवड प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या दरम्यान केली जात असते.
मात्र दुष्काळी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात शेतकऱ्याचा हिवाळ्यातील खरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
योग्य नियोजनातून हे शक्य होत असून एकरी १२ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील सोनलवाडी येथील शेतकरी नाथा हेगडे
यांनी खडकाळ माळरानावर दोन एकर क्षेत्रावर बाॅबी खरबूज लागवड केली आहे. मुळात जानेवारी ते मार्च या दरम्यान लागवड करण्यात येत
असलेल्या खरबूजची लागवड हिवाळ्यात केली. यामुळे ऐन हिवाळ्यात त्यांचे खरबूज काढणीस तयार झाले आहे. अर्थात शेतकरी नाथा हेगडे यांनी हिवाळ्यात उत्पन्न मिळावे या दृष्टीने लागवड केली.
खरबूज लागवड केल्यानंतर त्याला पाणी आणि खतांचे योग्य नियोजन केल्याने त्यांना ३० टन उत्पन्न मिळेल. यातून त्यांना अवघ्या तीन महिन्यांमध्ये सुमारे १२ लाखांचे उत्पन्न मिळेल; असा त्यांना विश्वास आहे.
यासाठी त्यांनी शेती तज्ञ कालिदास बजबळकर यांचे मार्गदर्शन घेतले होते. यामुळेच हिवाळ्यातील खरबूज लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
0 Comments