google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील विशाल काटकर यांना गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड कंपनीचा 2024 चा उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार प्रदान

Breaking News

सांगोला येथील विशाल काटकर यांना गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड कंपनीचा 2024 चा उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार प्रदान

सांगोला येथील विशाल काटकर यांना गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड कंपनीचा 2024 चा उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार प्रदान


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला येथील विनायक ट्रेडिंग कंपनीचे मालक विशाल रमेश काटकर यांना गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड कंपनीचा 2024 सालातील उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशाल रमेश काटकर यांच्याकडे गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लि. कंपनीची गोदरेज पशुखाद्याची सुमारे 40 वर्षांपासून एजन्सी आहे.

 गोदरेज पशुखाद्य विक्रीमध्ये काटकर यांचा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या तीन राज्यांमध्ये उत्कृष्ट विक्रेता म्हणून प्रथम क्रमांक मिळत आहे. 

विक्रीमध्ये सतत प्रथम क्रमांक मिळवित असल्यामुळे गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लि. कंपनीच्या वतीने 12 डिसेंबर रोजी गोवा येथे कंपनीचे सीईओ कॅप्टन ए. वाय. राजेंद्र व जनरल बिझनेस हेड

 ए .एम. ढोले यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह  व सन्मानपत्र देऊन विशाल काटकर यांना गौरविण्यात आले.

यावेळी विनायक ट्रेडिंग कंपनीचे मार्गदर्शक रमेश काटकर, कंपनी सेल्स मॅनेजर पी.एन.भोपळे, सेल्स ऑफिसर पांडुरंग रणवरे व कंपनीचे सर्व सेल्स मॅनेजर उपस्थित होते. 

विशाल काटकर यांना गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लि. कंपनीचा 2024 चा उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments