google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगलीत भीषण अपघात; कृष्णा नदीवरील पूलावरून कार कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Breaking News

सांगलीत भीषण अपघात; कृष्णा नदीवरील पूलावरून कार कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

सांगलीत भीषण अपघात; कृष्णा नदीवरील पूलावरून कार कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू


सांगली :कोल्हापूर येथील लग्न सोहळ्यावरून परतत असताना भरधाव वेगातील कार कृष्णा नदीच्या पूलावरून कोसळून तीनजण ठार झाल्याची घडली आहे. 

या घटनेत तीनजण जखमी झाले असून यामध्ये पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अंकली येथे ही घटना घडली आहे.

प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर ( वय ३५) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (२३) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर ( वय ४२), वरद संतोष नार्वेकर ( वय २१) 

आणि समरजित प्रसाद खेडेकर (वय ५)  या तिघांचा समावेश आहे. हे सर्वजण सांगली आकाशवाणी केंद्रामागे असणाऱ्या गंगाधर नगर येथील रहिवासी आहेत.

Post a Comment

0 Comments