"कर्मयोगी आबासाहेब" दुसऱ्या आठवड्यात ही बॉक्स ऑफिसवर हिट.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जागतिक विक्रमी चित्रपट निर्माते अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित "कर्मयोगी आबासाहेब" हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात ही बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे.
सिंघम अगेन, भुलभुलैया 3 यासारख्या चित्रपटांना टक्कर देत संपूर्ण भारतभरात अकरा दिवसात ₹10.27 कोटींचा व्यवसाय केला.
अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित आणि लिखित "कर्मयोगी आबासाहेब" या मराठी चित्रपटात आबासाहेबांच्या वारशाचा सन्मान, सशक्त संवाद आणि हृदयस्पर्शी कथन यांचा मिलाफ आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच
अँम्सटरडॅम लिफ्ट-ऑफ आणि क्राऊनवूड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाने "गिनीज बुक आणि हाई रेंज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही प्राप्त केला आहे.
या चित्रपटाची निर्मिती मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन अँड मुंबई क्रिएशन एन्टरटेन्मेंट, निर्माता बाळासाहेब महादेव एरंडे आणि मारुती तुळशीराम बनकर यांचे आहे. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या भूमिकेत अनिकेत विश्वासराव आणि
हिंदी आणि मराठीतले तब्बल 28 कलाकारांनी आपापली भुमिका सक्षम वठवली आहे. प्रसिध्द गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी म्युझिक दिले असुन रिलायन्स एंटरटेनमेंट ने जगभर रिलीज करण्याची कामगिरी पार पाडली आहे .
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांचा 2018 साली वेडा बी एफ सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याही सिनेमाला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
त्याही चित्रपटाने वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. वेडा BF, बेतुका, कम ऑन विष्णू, ब्रेक डाऊन धारावी कट्टा , असे एकाहून एक सरस चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केले आहे.
0 Comments