google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..डॉ.बाबासाहेब देशमुख यांना 11 उमेदवारांचा जाहीर पाठींबा

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..डॉ.बाबासाहेब देशमुख यांना 11 उमेदवारांचा जाहीर पाठींबा

ब्रेकिंग न्यूज..डॉ.बाबासाहेब देशमुख यांना 11 उमेदवारांचा जाहीर पाठींबा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार व तालुक्यातील लोकप्रिय युवाना डॉ.बाबासाहेब देशमुख 

यांच्या विजयात्री खात्री झाल्याने 11 उमेदवारांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती शेकापचे चिटणीस दादाशेठ बाबर यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब देशमुख यांना राजरत्न गडहिरे , सोमा मोटे , अनिल शेंडगे,हरिश्चंद्र चौगुले, किरण साठे,उमेश मंडले, विनोद बाबर, संजय हाके ,सुदर्शन घेरडे , धनाजी पारेकर, संजय पाटील आदी उमेदवारांनी जाहीर पाठिंबा दिला. 

डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून सांगोला तालुक्यात सर्वत्र नवचैतन्य पसरले आहे.

 डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या तीन वर्षापासून सांगोला तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात मोठा नावलौकिक प्राप्त केला आहे. 

सर्वसामान्य जनता, गोरगरीब दिनदलित जनतेमधून डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा नावाचा मोठा जयघोष सुरु असून सर्वांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विजयाची खात्री झाली आहे.

 त्यामुळे शेतकरी कामगार पक्षात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरु असून आज 11 उमेदवारांना सुध्दा विजयाची खात्री झाल्याने त्यांनी शेकापच्या डॉ.बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments