खळबळजनक.. सांगोल्यात नवा ड्रामा तयार झाला असून नाव एक आणि उमेदवार दोन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात नाट्यमय घडामोडी घडणारा
विधानसभा मतदारसंघ ठरत आहे. सुरवातीला उमेदवार ठरवण्यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस झाली.
गेल्या आठ दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरू असताना नवीन ड्रामा सांगोल्यात पाहायला मिळाला.सांगोल्यात नवा ड्रामा तयार झाला असून नाव एक आणि उमेदवार दोन झाले आहेत.
सांगोल्यात शेकापचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या सारखंच नावं असणार्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील बाबासो गणपत देशमुख यांनी देखील
सांगोला विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जाची छाननी करण्यात आली. छाननी केल्यानंतर बाबासो गणपत देशमुख यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.
त्यामुळे सांगोला विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख व बाबासो गणपत देशमुख असे दोन उमेदवार सारख्या नावाचे मैदानात दिसणार आहे.
दरम्यान, विरोधी उमेदवाराला पराभव समोर दिसत असल्याने त्यांना अशा पद्धतीने डमी उमेदवार उभा करावा लागत असल्याची टीका शेकाप कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी हा उमेदवार धोकादायक ठरू शकतो. तसेच नाम साधर्म्य असलेले हा उमेदवार अर्ज माघारी घेणार
की लढणार हे चित्र 4 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्या मतांच्या विभागणीसाठी बाबासो देशमुख याना मैदानात उतरवलं गेले अशी चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे.
0 Comments