ब्रेकिंग न्यूज..रविवारी सांगोल्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
सांगोला येथे जाहीर सभेची जय्यत तयारी सुरूअसुरांचा सहारा कराया मशाल हाती दे अशी प्रार्थना करत शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या सहा दिवसाचा दौरा शिवसेनेने आज जाहीर केला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या दौऱ्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.
रविवार दिनांक 10 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता सांगोला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या
प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची तोफ सांगोला मतदारसंघांमध्ये धडधडणार आहे.
यावेळी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर काय टीका करणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
गद्दारांचा कोणत्या शब्दात समाचार घेणार, याकडेही संपूर्ण राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी सांगोला शिवसेना यांनी जय्यत तयारी सुरू केलेली आहे.
0 Comments