सांगोला येथे चौंडेश्वरी पतसंस्थेच्या वतीने दीपावली भेट वस्तूंचे वाटप सुरू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
चौंडेश्वरी क्रेडिट को -ऑप सोसायटी, सांगोला यांचे वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरलेप्रमाणे सभासदांना दीपावली भेट
म्हणून प्रत्येक सभासदास २ किलो साखर,१किलो गरा व सुगंधी साबण,तेल,ऊटणे या वस्तूंचे वाटप करण्यात येत असून त्याचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन श्री. मधुकर कांबळे यांचे शुभहस्ते करण्यात आले .
सदर कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ सभासद श्री. संजय दौडेसाहेब यांच्या शुभहस्ते श्री.चौंडेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
प्रथम सर्व उपस्थित सभासदांचे व संचालकांचे स्वागत व्हाईस चेअरमन श्री संजय लाटणे यांनी केले.
भेटवस्तू वाटप संचालकांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर समारंभास व्हा.चेअरमन संजय लाटणे, संचालक राजकुमार दौडे,अवधूत कुमठेकर, अनिल लाटणे सर, विजय चोथे,
शिवदास खडतरे, दत्तात्रेय दिवटेसो व संस्थेचे सभासद रमेश भंडारे, महादेव दिवटे, बाबुराव दाते, रमेश कांबळे, धनंजय दौडे, प्रमोद टेके,शकील शेख, प्रमोद टेके, जहांगीर मुलानी, पप्पू कलढोने, उपस्थित होते.
संस्था सचिव सौ. शितल डोईफोडे यांनी सर्व सभासदांनी ३० ऑक्टोंबर पर्यंत सुट्टीचा दिवस सोडून संस्था कार्यालयातून भेटवस्तू घेऊन जाण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी चेअरमन राजकुमार दौडे यांनी केले.
0 Comments