सांगोला वनविभागाच्या साथीने आणि संदेश पलसे यांच्या प्रयत्नाने विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला मिळाले जीवदान
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला येथील साळुंखे वस्ती या ठिकाणी विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला पक्षी व सर्पमित्र संदेश पलसे व गावातील शेतकरी, पक्ष मित्र सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले आहे.
शेतातील विहिरीत कोल्हा पडला असल्याचे शेतीमालक मारुती शंकर साळुंखे यांना निदर्शनास आले.
ही घटना पाहताच त्यांनी सांगोला येथील सर्प व पक्षी मित्र संदेश पलसे यांना फोन द्वारे माहिती दिली. वन कर्मचारी वनिता इंगोले व गोवर्धन वरकुटे यांना फोन द्वारे ही माहिती दिली.
वन कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने कोल्ह्याला विहिरीतून व्यवस्थित बाहेर काढण्यात आले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर जाळी उघडताच कोल्ह्याने निसर्गात धूम ठोकली.
यावेळी सोनू खडतरे, लखन चव्हाण, योगेश साळुंखे यांनी विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली या विशेष कामी नागरिकांनी संदेश पलसे व वन विभागाचे कौतुक केले.
0 Comments