google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील दुर्दैवी घटना..भरधाव कारने दुचाकीस ठोकरले; एक ठार, एक गंभीर जखमी

Breaking News

सांगोला तालुक्यातील दुर्दैवी घटना..भरधाव कारने दुचाकीस ठोकरले; एक ठार, एक गंभीर जखमी

 सांगोला तालुक्यातील दुर्दैवी घटना..भरधाव कारने दुचाकीस ठोकरले; एक ठार, एक गंभीर जखमी


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : भरधाव डस्टर चारचाकी गाडीने दुचाकीस समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार 

तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सांगोला-जत रोडवरील सोनंदजवळील चव्हाण मळा येथे घडली आहे. 

आनंद चव्हाण (वय-५५, रा. सोनंद, ता.सांगोला) हे या अपघातात मृत पावले असून सागर गळवे (वय २५, रा. सोनंद, ता.सांगोला) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

आनंद चव्हाण व सागर गळवे हे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना

 जतकडून सांगोलाकडे येणाऱ्या भरधाव डस्टर कारने दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आनंद चव्हाण हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

 जखमी सागर गळवे यास अत्यवस्थ अवस्थेत सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सागर गळवे याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 हा अपघात एवढा भीषण होता की भरधाव कार चालकाने दुचाकीस्वारास शंभर फूट फरफटत नेले असल्याचे प्रत्यक्ष दर्शनीने सांगितले. याबाबत सांगोला पोलिसांत अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.

Post a Comment

0 Comments