google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. सांगोला -सांगली महामार्गावरील सांगोला चिंचोली बायपास जवळ भीषण अपघात; दोघेजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी

Breaking News

धक्कादायक.. सांगोला -सांगली महामार्गावरील सांगोला चिंचोली बायपास जवळ भीषण अपघात; दोघेजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी

धक्कादायक.. सांगोला -सांगली महामार्गावरील सांगोला चिंचोली बायपास जवळ भीषण अपघात; दोघेजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला -तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची भरधाव वेगाने जाणारी कार पाठीमागून माल ट्रकला जोराची धडकून भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले.

 हा अपघात आज सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास सोलापूर - सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास ता. सांगोला येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

सुखदेव बामणे-४० व नैनेश कोरे -३१ दोघेही रा. नांदणी जि. कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे -४२,रा.नांदणी ,सुधीर चौगुले- ३५ रा.वडगाव ,सुरज विभुते-२१ रा.कोठली

 हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून , त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व

 सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोड वरुन बाजूला काढून जखमींना उपचार करता तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९ ०८ या वॅगनार कार मधून तुळजापूर येथील नवरात्री निमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते.

 दर्शनानंतर त्याच कारमधून पाचजण सोलापूर कडून हायवेने नांदणी जि. कोल्हापूर गावाकडे निघाले होते वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपास वर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून

 डाळिंब घेऊन जाणाऱ्या १६ चाकी एम पी -२० झेड एम -९५१८ या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला.

Post a Comment

0 Comments