google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक.. सांगोला नगरपरिषद शहरात साप,घुशी यांचे साम्राज्य..नागरिक भयभीत..बाभळी काढण्याची सांगोला नगरपालिकेकडे मागणी..

Breaking News

खळबळजनक.. सांगोला नगरपरिषद शहरात साप,घुशी यांचे साम्राज्य..नागरिक भयभीत..बाभळी काढण्याची सांगोला नगरपालिकेकडे मागणी..


खळबळजनक.. सांगोला नगरपरिषद शहरात साप,घुशी यांचे साम्राज्य..

नागरिक भयभीत..बाभळी काढण्याची सांगोला नगरपालिकेकडे मागणी.. 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला: शहरातील बाहेरचा भाग झपाट्याने विकसित होवू लागला आहे.पुर्वीच्या काळी सांगोला शहराच्या गावा बाहेरुन वाहणारा ओढा आज शहराचा मध्यवर्ती भाग झाला आहे..

शहरीकरण झाल्यामुळे बाह्य भागात ओढ्याच्या अवती भवती बांधकामे होवू लागली आहेत..मात्र नागरी सुविधा,रस्ते,गटारी यांची सोय नाही.

सांगोला शहरातील उत्कर्ष शाळा कडे जाणारा रोडचा परिसर गेल्या दहा वर्षात झपाट्याने विकसित होवू लागला आहे..

मात्र काही नागरिकांनी गुंतवणुक म्हणून प्लॉट घेऊन ठेवले आहेत.बरेच प्लॉटधारक परप्रांतीय आहेत..त्यांच्या खुल्या जागेत नागरिक खरकटे, केर कचरा टाकत आहेत. कुत्री,जनावरे हैदोस घालत आहेत. 

चिलार,बाभळी वाढत आहेत. त्यामुळे घुशी,साप,धामिन यांचा वावर वाढला आहे. नुकतेच काही दिवसा पुर्वी फॅबटेक कॉलेज मधील प्रा.तन्मय ठोंबरे यांचे घरात दुपारचे वेळी भला मोठा साप शिरला..

दारात बसलेली मांजर त्याला घरात येवू देईना,त्यामूळे त्याने मागील बाजूस पळ काढला..त्यामुळे तो घरात शिरला की मागील बाजूस असलेल्या बाभळीत घुसला,हे कळण्यास मार्ग नाही.

यावेळी परिसरातील नागरिक,महिला गोळा झाल्या.सर्पमित्र अकबर बागवान यास बोलावले..मात्र साप निघुन गेला असला तरी भीती मुळे घरात जाणे व वावरणे कठीण होवुन बसले आहे.

प्लॉट मालक भेटत नाहीत, संपर्क र्होत नाही त्यामूळे नगरपालिका प्रशासनाने यात लक्ष घालावे व नागरी, नागरिकाच्या सुरक्षा साठी बाभळी,चिलार काढुन वावर सुखद व्हावा,अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments