धक्कादायक.. सक्का भाऊ पक्का वैरी! डोक्यात दगड घालून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना
मागील किरकोळ कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर या गावात आज पहाटे 5 च्या सुमारास उघडकीस आली आहे.
नवनाथ रामचंद्र पुजारी (वय 24) असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव असून याप्रकरणी लहान भाऊ सोनारसिद्ध रामचंद्र पुजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वडील रामचंद्र दाजी पुजारी (वय 52) त्यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आज पहाटे 5 च्या सुमारास वेळी व राहत्या घरी फिर्यादीचा मुलगा सोनारसिद्ध याने पाठीमागील भांडणाचा राग मनात धरुन व गाडी भाड्याने का घेवुन गेला नाही
या कारणावरुन फिर्यादीचा दुसरा मुलगा नवनाथ याने सोनारसिध्द यास मारहाण केली होती याचा राग मानात धरुन तसेच वेळोवेळी खर्चासाठी पैसे देत नाही
म्हणुन सोनारसिध्द याने नवनाथ यास झोपलेल्या ठिकाणी नवनाथ याचे डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे हे करीत आहेत
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, पुरुषोत्तम धापटे, पोलीस हवालदार प्रमोद मोरे, विक्रम काळे आदींनी भेट दिली आहे.
0 Comments