google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार! सोलापूर जिल्ह्यातील महिला डॉक्टरची 67 लाखांची फसवणूक; अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी फसविले; अनोळखी कॉल आल्यास घाबरू नका, पोलिसांशी संपर्क साधावा

Breaking News

धक्कादायक प्रकार! सोलापूर जिल्ह्यातील महिला डॉक्टरची 67 लाखांची फसवणूक; अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी फसविले; अनोळखी कॉल आल्यास घाबरू नका, पोलिसांशी संपर्क साधावा

धक्कादायक प्रकार! सोलापूर जिल्ह्यातील महिला डॉक्टरची 67 लाखांची फसवणूक;


अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी फसविले; अनोळखी कॉल आल्यास घाबरू नका, पोलिसांशी संपर्क साधावा 

सोलापूर शहरातील नामांकित दवाखान्यातील एका महिला डॉक्टरला अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६७ लाख २४ हजार रुपयाला फसविले आहे. 

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा तपास करीत आहेत.

महिला डॉक्टरला ८ जूनला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुमच्या आधारकार्डवर सीमकार्ड खरेदी करून पॉर्न साईटला भेट 

दिल्याचे सांगून याविरुद्ध टिळक नगर, मुंबईत गुन्हा दाखल आहे म्हणून फोन कट केला. त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता व्हॉट्‌सॲप कॉल आला.

तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून नरेश गोयल हा मोठा आर्थिक घोटाळेबाज असून त्याच्या खात्यातून तुमच्या बॅंक खात्यात २० लाख रुपये आल्याचे सांगून यात तुम्ही अटक होऊ शकता, आम्ही मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम आहोत.

तुम्ही व तुमच्या पतीला अटक होणार आहे. पण, तुमची परवानगी असल्यास यातून मार्ग काढू म्हणून फोन कट केला. त्यानंतर डॉक्टर महिलेने होकार दिल्यावर चार वेगवेगळ्या बॅंक खात्यांचे नंबर देण्यात आले. त्यात ६७ लाख २४ हजार रुपये पाठविले.

पाच दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पतीसोबत चर्चा करून सोलापूर शहर सायबर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे साडेसात लाख रुपयांची रक्कम होल्ड करता आली.

अनोळखी क्रमांकावरुन कॉल आल्यास घाबरू नका, पोलिसांशी संपर्क साधावा

अश्लील व्हिडिओच्या साईटला भेट दिल्याचे सांगून शहरातील एका महिला डॉक्टरला गुन्हा दाखल करून अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडून ६७ लाख २४ हजार रुपयांची रक्कम हडपली.

पण, असे अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलची सर्वांनी खात्री करावी, जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही.- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर

सापळा अन्‌ दोघांना अटक

गुन्ह्यातील संशयितांचा मुंबईतील पत्त्यावर शोध घेतला, पण त्याठिकाणी ते राहायला नव्हते. पोलिस त्यांच्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवर लक्ष ठेवून होते. चार दिवसांपूर्वी ते सोलापूरच्या दिशेने येत असल्याचे लोकेशन मिळाले.

त्यानुसार पोलिसांनी सावळेश्वर टोल नाक्यावर सापळा लावला. चारचाकीतून येतील असा अंदाज करून पोलिस चारचाकी वाहने तपासत होते. काहीवेळाने त्या वाहनाचे लोकेशन पाकणीच्या पुढे दाखवत होते.

विद्यापीठाजवळील एका हॉटेलमध्ये तो क्रमांक थांबल्याचे लोकेशन मिळाले. तेथे तीन ट्रॅव्हल्स थांबल्या होत्या. 

साध्या वेशातील सहा पोलिस त्या प्रवाशांमध्ये मिसळले आणि महिला पोलिस अंमलदारास त्या क्रमांकावर कॉल लावायला सांगितले. कन्नडमध्ये बोलायला लावले.

ज्या महिलेने राँग नंबर म्हणून कॉल ठेवला तीच संशयित आरोपी असणार असे पोलिसांना माहिती होते. पोलिसांचा हा डाव यशस्वी झाला आणि तेथून दोघांना अटक करण्यात आली.

Post a Comment

0 Comments