google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक.. सांगोल्यात सुमारे 20 ते 25 दिवसांचे जनावराचे लहान पिल्लू गळा कापून पुरल्याचा धक्कादायक प्रकार खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी

Breaking News

खळबळजनक.. सांगोल्यात सुमारे 20 ते 25 दिवसांचे जनावराचे लहान पिल्लू गळा कापून पुरल्याचा धक्कादायक प्रकार खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी

खळबळजनक.. सांगोल्यात सुमारे 20 ते 25 दिवसांचे जनावराचे लहान पिल्लू गळा कापून पुरल्याचा धक्कादायक प्रकार


खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- कोणीतरी कधीतरी जमिनीत धन पुरून ठेवले आहे असे मानून ते गुप्तधन मिळवून श्रीमंत होण्यासाठी गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय असतात.

 श्रीमंत होण्याचा शॉर्टकट म्हणजे गुप्तधन अशीही एक अंधश्रद्धा अशा लोकांमध्ये असते.

मग त्यासाठीच बळी देण्यासाठी नर किंव पशू शोधायचा आणि मग त्याचा जीव घेऊन धन शोधायचे, असे प्रकार होत राहतात.

अघोरी प्रकरणं आणि कृत्यांवर चाप बसवण्यासाठी म्हणून अनेक संघटना आणि शासन पातळीवरही प्रयत्न सुरु असतानाच

 एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगोल्यात सुमारे 20 ते 25 दिवसांचे जनावराचे लहान पिल्लू गळा कापून पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महूद येथील व्यसनमुक्ती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव हे नेहमी शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास शेतात गेले होते.

 त्यावेळी त्यांना शेतात खड्ड्यावर लिंबे, नारळ, पान, सुपारी, हळकुंडे, भाकरीची चवड, हळदी-कुंकू, शेंदूर व टाचण्या लावलेली उलटी पुरलेली बाहुली,

 उदबत्त्या असे साहित्य आढळून आले. त्यांनी बारकाईने पाहिले असता हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. 

जनावराचे लहान पिल्लू गळा कापून पुरले

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तो खड्डा उकरून पाहिला असता, खड्यातून दुर्गंधी येत होती.

 नरबळीच्या संशयावरून पोलिसांनी हळदी-कुंकू, शेंदूर, टाचण्या खोचलेली उलटी बाहुलीसह असलेला

 खड्डा उकरून पाहिला सुमारे 20 ते 25 दिवसांचे जनावराचे लहान पिल्लू गळा कापून पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महूद, सांगोला येथील इरिगेशन कॉलनीजवळ हा प्रकार उघडकीस आला.

Post a Comment

0 Comments