google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ते गोंदवले एस.टी. बस सेवा सुरू करण्याची शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी

Breaking News

सांगोला ते गोंदवले एस.टी. बस सेवा सुरू करण्याची शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी



सांगोला ते गोंदवले एस.टी. बस सेवा सुरू करण्याची शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( प्रतिनिधी )- शहर व तालुक्यात सद्‌गुरू गोंदवलेकर महाराज यांचा मोठ्या प्रमाणावर भक्तगण असून त्या भक्तांना श्री. क्षेत्र गोंदवले येथे

 जाण्यासाठी एस.टी. बसची कोणतीही सोय नाही. सांगोले शहर व तालुक्यातील भक्तांच्या सोयीसाठी सकाळी ठीक ९.०० वाजता सांगोला ते श्री. क्षेत्र गोंदवले येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा सुरू करावी. 

जेणे करून सांगोले तालुक्यातील ग्रामीण भागातील भक्तगणांना या एस.टी.बस सेवेमुळे सद्‌गुरूंच्या दर्शनाचा लाभ होणार आहे. ही बस सेवा महूद, साळमुख, पिलीव, म्हसवड या मार्गे सुरु केल्यास भक्तांना दर्शन व प्रसाद घेऊन परत सांगोल्याला येणे

 सोयीस्कर होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून अध्यक्ष अच्युत फुले व सचिव संतोष महिमकर यांच्यासह सदस्यांनी हे निवेदन आगर प्रमुख व आमदार शहाजीबापू पाटील यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments