मोठी बातमी.. सांगोला तालुक्यातील मुला-मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज - पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- जि.प.प्रा.शाळा भिमनगर सांगोला येथे दि.28 रोजी मुला-मुलींची सुरक्षितता व संरक्षण याविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम समाजसेवक बापूसाहेब ठोकळे
यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रूपाली उबाळे मॅडम (पीएसआय)व निमगिरे मॅडम (पो.काॅन्स.) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पीएसआय रूपाली उबाळे मॅडम व निमगिरे मॅडम यांचा स्वागतपर सत्कार करण्यातआला.पीएसआय रूपाली उबाळे मॅडम यांनी सध्याच्या काळात
अल्पवयीन मुलां- मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार,छेडछाड याविषयी सखोल मार्गदर्शन केले.यावर उपाय म्हणून बॅड टच,गुड टच या स्पर्शाची जाणीव आपल्या मुलांना ओळखता आली पाहिजे.ही काळाची गरज आहे.
उपस्थित पालकांना याबाबतीत जाणीव करून दिली की आपल्या मुलांविषयी आपण सतर्क राहण्याची गरज आहे.मुलांशी संवाद साधला पाहिजे मुलांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.
यामुळे येणाऱ्या संकटावर आपण वेळीच मात करू शकतो. प्रसंगानुरूप उदाहरणे देऊन त्यांनी पालकांमध्ये जागृकतेची भावना निर्माण केली. या कार्यक्रमाचे वेळी किशोर बनसोडे,विकास बनसोडे,प्रवीण बनसोडे,अविनाश चंदनशिवे, विजया बनसोडे
,मैना बनसोडे, रेश्मा बनसोडे,जयंती बनसोडे, लक्ष्मी बनसोडे,शिल्पा रणदिवे, अनिता काटे शाळेचे मुख्या.शेळके मॅडम,
सहशिक्षिका मैना गायकवाड मॅडम,उपस्थित सर्व पालक वर्ग भिमनगर ,साठे नगर मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
0 Comments