google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. माण, खटावसह सांगोल्याला मिळणार एक टीएमसी पाणी कृष्णा नदीवरील पुराच्या ०.५ टीएमसी पाण्याचा वापर

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. माण, खटावसह सांगोल्याला मिळणार एक टीएमसी पाणी कृष्णा नदीवरील पुराच्या ०.५ टीएमसी पाण्याचा वापर

ब्रेकिंग न्यूज.. माण, खटावसह सांगोल्याला मिळणार एक टीएमसी पाणी कृष्णा नदीवरील पुराच्या ०.५ टीएमसी पाण्याचा वापर


शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

 सोलापूर : टेंभू उपसासिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील माण, खटाव व सांगोला तालुक्यास कृष्णा नदीच्या पुराचे ०.५ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला असून, आणखी एक टीएमसी पुराचे पाणी

 उचलण्याचे उद्दिष्ट असल्याचे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा.य. रेड्डीयार यांनी सांगितले.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारित टप्पे व सातारा जिल्ह्यातील माण, खटाव व सोलापूर जिल्ह्यातील 

सांगोला लाभक्षेत्रामध्ये उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या प्रगतीबाबत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या, कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखालीनुकतीच बैठक घेतली. 

यावेळी प्रभाकर देशमुख, अभय जगताप, डॉ. बाबासाहेब देशमुख, अनिल देसाई व सुरेंद्र गुदगे यांचेसह माण खटाव व सांगोला मतदार संघातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत खासदार मोहिते पाटील व (स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगोला तालुक्यातील माण नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे, तसेच टेंभू योजनेच्या आटपाडी डाव्या कालवामार्फत निंबवडे

 तलावाखालील बंदिस्त वितरिकेद्वारे लोटेवाडी खवासपूर व साण नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी गावांचे सर्वेक्षण करा

या बैठकीत टेंभू उपसा सिंचन योजनेच्या प्रगती बाबत आढावा घेत प्रवाही पद्धतीने ज्या गावांना पाण्याचा लाभ होणार आहे, परंतु सर्वेक्षणामध्ये समाविष्ट नसलेली गावे यांचे फेरसर्वेक्षण करावे, अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली.

सोडण्याची मागणी केली. सद्यःस्थितीत पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीला पुराच्या पाण्यामुळे पातळी वाढलेली असल्याने योजना कार्यान्वित करून टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील माण,

 खटाव व सांगोला तालुक्यामध्ये पाणी सोडण्यात आल्याचे टेंभू प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments