महात्मा फुले चौकात पाण्याचे तळे, नागरिक त्रस्त; उपाययोजना करण्याची डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- महात्मा फुले चौकात पाणी साचल्याने या ठिकाणाहून ये-जा करणारे नागरिक पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सांगोल्यात पावसाचा जोर वाढल्याने येथे रस्ता आहे की तळे आहे हेच समजेनसा झाले आहे.
पाणी साचण्याची समस्या जैसे थे आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून व्यापारी बांधवांसह वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
महात्मा फुले चौकासह पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाण्याची तळी साचत आहेत.
त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. खड्डयातील पाणी अंगावर उडत असल्याने चकमकी होत आहेत.
तर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघात होत आहेत.या पाण्याची दुगंधी सुटत असल्याने या रोडवरून जाणारे
वाहनचालक अत झाले आहेत. दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना नाकाला रूमाल लावून जावे लागत आहे.
याच पाण्यात डासांची वाढ होते. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या पाण्यातून वाहन गेल्यास इतरांच्या कपड्यावर पाण्यातून वाहन गेल्यास कपड्यावर घाण पाणी उडते.
एका वाहनामुळे दुसऱ्या वाहनचालकाच्या वा पादचाऱ्याच्या अंगावर पाणी उडाल्यास त्यांच्यात वाद निर्माण होतो. अनेक वेळा प्रकरण वादा पर्यंत जाते.
साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज वाहनचालकास येत नाही. रस्त्यावर पाणी पाहून समोर खड्डा आहे की नाही, याची त्याला कल्पना येत नाही आणि तो
सरळ आपले वाहन खड्ड्यात घालतो. शहरातील बर्याच भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणातः साचत आहे.
संबंधीत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देवून देवून सदरचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा, अशी मागणीही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
0 Comments