google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. आमदार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील व स्वराज्य पक्षाचेजिल्हाउपाध्यक्ष सचिन महांकाळ यांच्या मध्यस्थीने व्यापारी व शेतकरी यांना दिलासा

Breaking News

मा. आमदार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील व स्वराज्य पक्षाचेजिल्हाउपाध्यक्ष सचिन महांकाळ यांच्या मध्यस्थीने व्यापारी व शेतकरी यांना दिलासा

 मा. आमदार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील व स्वराज्य पक्षाचे


जिल्हाउपाध्यक्ष सचिन महांकाळ यांच्या मध्यस्थीने व्यापारी व शेतकरी यांना दिलासा

कृषी उत्पन्न बाजार समितीकडुन कमीशनसाठी लागणारा तगादा रद्द

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधीः परराज्यातील डाळींब व्यापारी यांनी सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला कमीशन देणे बंधनकारक असेल असा तगादा 

कृशी उत्पन्न समितीने लावला असताना त्या कमीशनचा बोजा हा तालुक्यातील शेतकरी, वाहनधारक यांच्यावर पडत असल्याचे लक्षात आल्याने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काॅगं्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील व स्वराज्य पक्षाचे 

उपाध्यक्ष सचिन महांकाळा यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न समितीचे संचालक राम बाबर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन सांगोला येथे बैठक पार पडली व त्यामध्ये व्यापारी, शेतकरी व वाहनधारक यांना मोठा दिलासा मिळाला 

असल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन महांकाळ यांनी दिली.

यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम बाबर यांनी असा मुद्दा मांडला की, 

परराज्यातील डाळींब व्यापारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून खरेदी केलेला माल सदर व्यापारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला येथे आणूणच विक्री करावा व त्यासाठी लागणारा

 विक्री परवाना (लायसन) काढुन विक्री होणारा माल यावर 10 टक्के कमीशन कृषी उत्पन्न बाजार समितीला देणे बंधनकारक असेल. त्यानंतर चर्चा चालू असताना कृशी उत्पन्न समितीकडुन कमीशनची 

रक्कम 10 टक्के वरुन 1 ते 50 पैसे टक्के पर्यंत खाली आणली गेली परंतु विक्री होणारा माल आण् ित्यावर लागणारा कमीशनचा पैसा या सगळयाचा भार तालुक्यातील शेतकरी यांच्यावर पडणार

 असल्याचे लक्षात आल्याने दिपकाआबा साळुंखे पाटील व सचिन महांकाळ यांनी कृषी उत्पन्न समितीची ही जाचक अट रद्द करण्यासाठी मागणी लावून धरली.

संपुर्ण चर्चेअंती सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला 

की, परराज्यातील व्यापारी यांनी जो माल शेतकऱ्याच्या बांधावर जावून खरेदी केला आहे त्यासाठी कृशी उत्पन्न बाजार समितीला कोणत्याही प्रकारची कमीशन टक्केवारी देणे नाही. 

व्यापाऱ्यानी खरेदी केलेला माल त्यांच्या सांगोला येथील सध्या वास्तव्यात असणाऱ्या रुमवर आणून विक्री करावा व बाॅक्स पॅकिंग करुन बाहेर पाठवावा.

 यामध्ये स्थानिक नागरीक व रस्त्यावरील वाहने तसेच पादचारी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी या व्यापाऱ्यानी घेणे बंधनकारक असेल असे ठरले. 

या बैठकीसाठी राष्ट् वादी काॅंगे्रसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील, स्वराज्य पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन महांकाळ, 

तालुकाप्रमुख विशाल केदार, कृषी उत्पन्न समितीचे संचालक राम बाबर, अकोला गावचे सरपंच सोमनाथ शिदे, शेकापचे नेते

 चिंचोली मा. ग्रा. प. सदस्य संजु शेजाळ यांच्यासह शेतकरी वर्ग व वाहन चालक-मालक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments