महसूल पंधरवड्यात कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद कार्य~ तहसीलदार संतोष कणसे सांगोला तहसील कार्यालयात महसूल पंधरवडा कार्यक्रम संपन्न.
कोळा वार्ताहर( शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यात महसूल पंधरवड्यात मंडल निहाय सर्कल तलाठी पोलीस पाटील सर्वच कर्मचारी यांनी महसूल विभाग हा शासन आणि शासनाचे ध्येयधोरण आणि निर्णयांची अंमलबजावणी करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत
पोहोचविण्यात महसूल प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावली असून सर्व कर्मचाऱ्यांनी चांगले गौरवास्पद कौतुकास्पद कार्य केले असल्याचे विचार सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी व्यक्त केले.
सांगोला तहसील कार्यालयात महसूल पंधरवड्याचा सांगता सोहळा व्यासपीठावर सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे तत्कालीन तहसीलदार संजय खडतरे, सेवानिवृत्त तहसीलदार किशोर बडवे निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे,
निवडणूक नायब तहसीलदार शुभांगी जाधव नायब तहसीलदार देसाई मॅडम सहाय्यक गट विकास अधिकारी मिलिंद सावंत अव्वल कारकून यांच्यासह सर्व सर्कल तलाठी बांधव पोलीस पाटील कोतवाल प्रशासनाची सर्वच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार संतोष कणसे पुढे म्हणाले जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा यशोगाथा सांगितल्या होत्या आपल्या प्रशासनाने सर्व एकूण सहा पाठवल्या स्वीकृत झाल्या याचा आनंद आहे.
आपला सांगोला तालुका मोठा आहे प्रत्येक व्यक्तीला नागरिकांना सर्वसामान्य जनतेला योग्य कामाला न्याय देण्याचे काम केलं लोकांची काम करत राहायचं मनाशी जिद्द धरून आलो
माझ्या आयुष्यात नोकरीच्या काळात ९ सार्वत्रिक निवडणुका केल्या लोकसभा चार विधानसभा पाच निवडणुकीचे काम केले.
अशा अनुभवातून आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना स्वास्थ्य कसे लाभेल याचा विचार केला.
आपल्या कुटुंबाबरोबर लोकांची कामे कशी झाली पाहिजे असा प्रयत्न केला. महसूल विभागात काम करताना महसूल हा प्रमुख घटक आहे २०१३ पासून शेतकऱ्याला मदत करण्याचे काम महसूल प्रशासनाकडे आले
यामुळे शेतकऱ्यांना ७६ हजार लोकांना ११५ कोटीच्या आसपास शेती पिकासाठी मदत वाटप करण्यात आली लाडकी बहीण योजनेचे ४२ हजार अर्ज प्राप्त झाले
त्याचेही काम सुरू आहे. रेशनिंग वाटपामध्ये गेल्या दहा महिन्यांमध्ये उत्कृष्ट काम प्रशासनाने केले आहे.
महसूल विभागातील सर्कल तलाठी पोलीस पाटील कोतवाल क्लार्क सर्वच कर्मचाऱ्यांना प्रशासन चांगले काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला असे कणसे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार संजय खडतरे म्हणाले गोरगरीब जनतेच्या केलेल्या कामाची दखल घेऊन माझा सन्मान करून माझा सत्कार केला आनंद झाला
तहसीलदार संतोष कणसे यांचे चांगले काम आहे शासनाचे निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.शासनाच्या सर्व मोहिमेत महसूल विभागाची भुमिका महत्वाचीअसल्याने जनतेची सेवा प्रामाणिक केली
महसूल पंधरवड्यात प्रतिमा उंचावण्यासाठी जोमाने काम झाले आज ज्यांना प्रशस्तीपत्र मिळाले त्यांच्यावर उत्कृष्ट काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी जनताभिमुख काम करावे असे सांगितले.
सेवानिवृत्त तहसीलदार किशोर बडवे आपल्याला समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा असल्याने महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम करताना तळागाळातल्या जनतेच्या
अपेक्षा लक्षात घेऊन काम करावे. महसूल विभागहा समाजाच्या सर्व घटकांशी संबंधित असल्याने केवळ महसूल पंधरवडा अभियान न राबवता वर्षभर जनतेसाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी सांगोला तालुक्याचे सेवानिवृत्त तहसीलदार संजय खडतरे किशोर बडवे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा सेवा निवृत्ती
बद्दल सन्मानपूर्वक सत्कार तहसीलदार संतोष कणसे यांच्या व प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमास सांगोला तालुक्यातील सर्व सर्कल तलाठी बांधव सर्व महसूल कर्मचारी सर्कल कोतवाल पोलिस पाटील सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उत्कृष्ट सूत्रसंचालन जया कल्हाळे मॅडम यांनी केले.
0 Comments