मोठी बातमी..कडलास नाका (शहीद अब्दुल हमिद चौक) ते
सांगोला महाविदयालय या रस्त्यावर गतिरोधक करावेत : युवा नेते डॉ. परेश खंडागळे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला जत, जवळा, घेरडी, पारे, डिकसळ, कडलास, सोनंद या गावांना जोडणाऱ्या
सांगोला कडलास रोडवरील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदार वाढली आहे. जड वाहतुकी याच रस्त्यावरून सुरू असल्याने
, व या रस्त्यावर महाविद्यालय तसेच हॉस्पिटल असल्यामुळे नागरिकांची वर्दळ नेहमीच असते. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासनाने याबाबतीत खबरदारी घेऊन कडलास नाका (शहीद अब्दुल हमिद चौक)
ते सांगोला महाविदयालय या रस्त्यावर महत्त्वाच्या आणि नेहमीच वर्दळ असणाऱ्या तीन ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी युवा नेते, खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ. परेश खंडागळे यांनी केली आहे.
कडलास नाका (शहीद अब्दुल हमिद चौक) ते सांगोला महाविदयालय या रस्त्यावर नामवंत महाविदयालय, पॉलिटेक्निक कॉलेज असून दररोज शेकडो विदयार्थी ये-जा करतात. तसेच या रसत्यावर अनेक नामवंत रुग्णालये
असून बहूसंख्येने रुग्णांची देखील वर्दळ असते. शिवाय या रस्त्यावर रहदारी देखील वाढली आहे. एवढेच नव्हे तर या रस्त्यावर जड वाहतुक देखील मोठया प्रमाणात वाढली असून अपघाताचे प्रमाण देखील होत
असल्याने सदर रस्त्यावर सांगोला महाविद्यालय जवळ, खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जवळ व जूने डॉ. सलगर हॉस्पिटल जवळ गतिरोधक बसविणे हे खूप गरजेचे आहे. तरी सदर मागणीची दखल घेऊन या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी निवेदनाद्वारे मागणी
करण्यात आली आहे.
सदरचे निवेदन सांगोला तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सांगोला नगरपालिका मुख्याधिकारी, व संबंधित बांधकाम विभाग यांना देण्यात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
0 Comments