google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पलपब ऑनलाइन कवी संमेलनामध्ये ७८ व्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याची यशोगाथा रंगली.

Breaking News

पलपब ऑनलाइन कवी संमेलनामध्ये ७८ व्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याची यशोगाथा रंगली.

पलपब ऑनलाइन कवी संमेलनामध्ये ७८ व्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याची यशोगाथा रंगली. 


सांगोला प्रतिनिधी/समाधान मोरे शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज 

    १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारताने ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. कवींनी आणि कवयित्रींनी स्वातंत्र्याची यशोगाथा कविता स्वरूपात मांडणे म्हणून पर्वणीच!! 

या कविता सादर करण्यासाठी पलपब पालघर समितीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करून कवींसाठी एक व्यासपीठ करून दिले. 

    मा. सौ. लीना पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पलपब महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री. किरण तोडकर सर व पलपब पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष मा. श्री. संदीप पवार सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

यांना साथ म्हणून संपूर्ण पलपब पालघर जिल्ह्याचे समितीने आपली जबाबदारी पार पाडली. मा. श्री. सुहास राऊत सर यांनी या कवी संमेलनाच्या पूर्वार्धाची जबाबदारी स्वीकारली व ती 

अतिशय उत्तमरीत्या पार पाडली तर मा. श्री. योगेश गोतारने सर यांनी या कवी संमेलनाच्या उत्तरार्धाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कवी संमेलनामध्ये श्रुती दळवी, 

सागर यशवंते, प्रसाद कोचरेकर, राजेश वेंडाले, स्नेहल पंडित, अशोक मोहिते, स्वाती पोळ, प्रतीक मतकर, कुलदीप सावतवान, अनुराधा  धामोडे, वैशाली वर्तक, अनिसा शेख, नंदा मघाडे, अनिता भोसले, 

शितल संखे, दीपक सोनवणे अशा नामवंत कवी/ कवयित्रींनी सहभागी होऊन आणि आपली 'स्वातंत्र्याची यशोगाथा' आपल्या लाडक्या श्रोत्यांना ऐकवून या कार्यक्रमाला रंगत आणली. तर या कार्यक्रमाचे निमंत्रित कवी 

मा. डॉ. विनायकराव जाधव सर, मा. गणपतराव कणसे सर, मा. रेखा दीक्षित मॅडम, मा. धनंजय इंगळे सर यांनी या कवी संमेलनामध्ये आपल्या कविता सादर करून कार्यक्रमाला उच्च स्थान मिळवून दिले.

 ऑन ड्युटी असलेले पोलीस उपनिरीक्षक आणि कवी मा. अजय चव्हाण सर काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी टीमला शुभेच्छा दिल्या. 

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सूर्यकांत शिंगटे सर, मा. प्रमोद सूर्यवंशी सर, आणि मा. डॉ. बालाजी मन्नाडे सर यांनी मार्गदर्शन करत आपल्या कविता सादर केल्या. 

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संदीप पवार सर यांनी सर्व कवींचे संपूर्ण कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करून आपले अध्यक्षीय भाषण संपविले.

 तर रूपाली राऊत मॅडमनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे ग्राफिक्स सुरक्षा मॅडम यांनी अतिशय सुंदर केले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले गेले. आणि इथे कार्यक्रमाची सांगता झाली. 

    हा कार्यक्रम छान आणि यशस्वीरित्या पार पाडला यासाठी सौ. लीना पाटील, किरण तोडकर व संदीप पवार सरांनी सगळ्यांचे आभार मानले व कवींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

    व या कार्यक्रमाचे प्रसारण पलपब च्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला केले जाईल अशी घोषणा केली.

Post a Comment

0 Comments