सांगोला शहरात डाळींबाचा लिलाव चिंचोली रोडला, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रोज लाखो रूपयांचे नुकसान
डाळींबाचा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीत न घेतल्यास 15 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा, झारखंडच्या व्यापार्यांची सांगोल्यात दादागिरी नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीने आता लक्ष घालण्याची गरज
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधीः शासनाच्या नियमाप्रमाणे डाळींचा लिलाव हा कृषी उत्पन्न बाजार समितीत घेणे व बाजार समितीचे उत्पन्न वाढविणे हा शासनाचा हेतू आहे.
परंतू कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या प्रशासक आहे, कोणाचाच वचक राहिलेला नाही झारखंडच्या व्यापार्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकार्यांना अर्थपुर्ण
वाटाघाटीकरून डाळींबाचा लिलाव चिंचोली रोडवर नेवून कृषी उत्पन्न बाजार समितीचे दररोज लाखो रूपयांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे चिंचोली रोडवरील होणारा डाळींचा लिलाव बंद करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा लिलाव आणावा.
अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी व नागरिकांनी दिला आहे. आ.डॉ.शहाजीबापू पाटील, मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी दखल घेवून हा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा
हा लिलाव न घेतल्यास व नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष न घातल्यास 15 ऑगस्ट रोजी सांगोला तहसिल कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा सतिशभाऊ सावंत व पत्रकार राजेंद्र यादव यांनी दिला.
सांगोला शहरात चिंचोली रोडवर गेली सात ते आठ महिन्यापासून झारखंड येथील व्यापार् यांनी दादागिरी करून कृषी उत्पन्न बाजार समिती लिलाव न काढता रस्त्यावरच लिलाव काढण्याची प्रथा पाडली आहे.
यामुळे चिंचोली, धायटी, शिरभावी, हलदहिवडी या भागातून ये-जा करणार्या नागरिकांना व वाहनांना या रस्त्यावरून ये-जा करता येत नाही.
हा लिलाव चिंचोली रोड वरील ओढा परिसरात काढला जात आहे. वास्तविक पाहता हा लिलाव सकाळी सहा ते दहा या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात करणे गरजेचे आहे.
परंतू हा लिलाव सायंकाळी 3 ते 8 या वेळेत चिंचोली रोडवरील रस्त्यावरच केला जातो. झारखंडचे व्यापारी शेतकर्यांच्या मालाला भाव न देता लुट करीत आहेत.
लिलावामध्ये सुध्दा दादागिरी करीत आहेत. शेतकर्यांचा डाळींबाचा माल एकदा चिंचोली रोडवरील लिलावात आला की, त्याचा दर पाडून लिलाव करून शेतकर् यांची लुट करीत आहेत.
याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव न घेतल्यामुळे दररोज लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव यावा यासाठी शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापना केल्या आहेत.
परंतू सांगोला तालुक्यात सत्ताधारीसह विरोधकांचा सुध्दा प्रशासनावर वचक नाही. आमदार शहाजीबापू पाटील, मा.आ.दिपकआबा साळुुंखे-पाटील हे नागरिकांच्या प्रश्नावर कसलाच आवाज उठवत नाहीत.
हे सर्वजण मुग गिळून गप्प आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्वांनी मिळून सत्तेसाठी हात मिळवनी केली आहे. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विरोधी पक्षाची कोणतीही भुमिका अध्याप पर्यंत जाहीर केली नाही.
सत्ताधार्यांशी हात मिळवणी करून त्यांचे कामकाज चालू आहे. जनतेच्या प्रश्नावर ते अजिबात आवाज उठवत नाहीत. अनेकजणांनी या तिन्ही नेेत्यांकडे तक्रारी करून ही हे तिन्ही नेते दखल घेत नाहीत.
त्यामुळे शेतकरी वर्गात या तिन्ही नेत्याबद्दल संतापाचे वातावरण पसरले आहे. झारखंडचे व्यापारी सांगोल्यात येवून दादागिरी करत असताना शेतकर्यांच्या या तिन्ही नेत्याकडे तक्रारी असताना हे का? दखल घेत नाहीत.
व चिंचोली रोडवरील डाळींंबाचा लिलाव बंद करून कृषी बाजार समितीत लिलाव का होऊ देत नाही? याबाबत शेतकर्यामधून या तिन्ही नेत्याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
चिंचोली रोडवरील डाळींबाचा लिलाव दोन दिवसांच्या आत बंद करून कृषी उत्पन्न बाजार समितीत न नेल्यास 15 ऑगस्ट रोजी सांगोला तहसिल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा सतिशभाऊ सावंत व पत्रकार राजेंद्र यांनी दिला आहे.
यामध्ये नगरपालिका प्रशासन व कृषी उत्पन्न बाजार समिती जाणीवपुर्वक दुर्लख करीत आहे. त्यांनी तात्काळ लक्ष घालावे. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकार्यांनी झारखंड च्या व्यापार्यांबरोबर अर्थपुर्ण वाटाघाटी केल्या आहेत.
सांगोला शहर व तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी परराज्यातून येणार्या डाळींब व्यापार्यांना राहण्यासाठी व्यापारासाठी दिलेल्या मालमत्तांची नगरपालिकेने अद्याप पर्यंत नोंदणी केलेली नाही. त्याचबरोबर
सांगोला पोलीस स्टेशनलाही या परराज्यातून येणार्या डाळींब व्यापार्यांच्या नोंदी नाहीत. त्यामुळे तात्काळ नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने चौकशी करावी - पत्रकार रोहित सुर्यागण
0 Comments