google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विधानसभेसाठी प्रा प्रबुद्धचंद्र झपके सर यांना काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी द्यावी : अजित चव्हाण युवक काँग्रेसचे पदाधिकारी लवकरच पक्षश्रेष्ठीकडे करणार मागणी

Breaking News

सांगोला विधानसभेसाठी प्रा प्रबुद्धचंद्र झपके सर यांना काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी द्यावी : अजित चव्हाण युवक काँग्रेसचे पदाधिकारी लवकरच पक्षश्रेष्ठीकडे करणार मागणी

सांगोला विधानसभेसाठी प्रा प्रबुद्धचंद्र झपके सर यांना काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी द्यावी :


अजित चव्हाण युवक काँग्रेसचे पदाधिकारी लवकरच पक्षश्रेष्ठीकडे करणार मागणी 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षात असलेल्या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे. 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभेची जागा भारतीय काँग्रेसला सोडून या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना उमेदवारी देण्यात यावी, यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकार्याना भेटून मागणी करणार 

असल्याची माहिती युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजित चव्हाण यांनी केली आहे. प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांचे नाव विधानसभा निवडणुकीत चर्चेत आल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

        परंपरागत दुष्काळी तालुक्यात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कोणताच पक्ष उघडपणे आवाज उठवत नसल्याचे चित्र सांगोला तालुक्यात दिसत आहे.

या सर्व समस्यांचा पाढाच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचविणार असल्याची माहिती ही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

       मुळातच सांगोला विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाने यापूर्वी शेकापच्या विरोधात लढवली आहे. प्रा प्रबुद्धचंद्र झपके हे उच्चशिक्षित असून त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने

 सांगोला तालुक्यात आहे. जुनी जाणती काँग्रेस आणि सध्याची युवकांची फळी यामध्ये मेळ घालण्याचे काम प्रा झपके यांनी केले आहे. 

पडत्या काळातही काँग्रेस पक्षाच्या सोबत राहून काँग्रेस पक्ष टिकविण्याचे काम प्रा झपके यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही मागणी युवक काँग्रेसचे पदाधिकारी करणार आहेत.

प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांचे संघटनकौशल्य उत्तम असून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत, सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे ते उपाध्यक्ष असून विद्यामंदिर परिवाराच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभा करण्याचे कार्य ते करीत आहेत. 

आदर्श नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगारनिर्मितीसाठी हातभार लावला आहे. लायन्स क्लबच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी तालुक्यांतील जनतेच्या संपर्कात आहेत. सांगोला नगरपालिकेचे 26 वर्ष नगरसेवक आणि

 एक वर्ष नगराध्यक्ष पदही त्यांनी भूषविले असल्याने सांगोला शहरातील आणि तालुक्यांतील प्रत्येक गावातील नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी पोषक वातावरण असल्याचे दिसत आहे.

माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची सांगोला तालुक्यातील धुरा प्रा झपके सर यांनी यशस्वीपणे पार पाडल्याने 

काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे आग्रही मागणी करणार आहेत. शेकापच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला आघाडीचा धर्म पाळला 

नसल्याने शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपाला मतांची आघाडी मिळाली आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेकाप, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांना पाठिंबा द्यावा : 

  सुनिल भोरे (जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस)

Post a Comment

0 Comments