खळबळजनक ..दीड महिन्यांपूर्वी मित्र गेला ; त्याने मित्राच्याच विधवा पत्नीवर बलात्कार सोलापूर जिल्ह्यातील घटना..
सोलापुरात मित्राच्या विधवा पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
बालाजी सत्यनारायण नल्ला असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विडी कामगार आहे.
तिच्या पतीचे दीड महिन्यांपूर्वीच निधन झाले. आरोपी व पीडित महिलेचा पती हे मित्र होते. ही महिला घरात एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला.
ही घटना सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
बालाजी याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली आहे.
0 Comments